Tuesday, January 14, 2025
HomeUncategorizedनायलॉन मांजाने कापला पोलिसांचाच गळा ! प्रकृती अद्यापही चिंताजनक

नायलॉन मांजाने कापला पोलिसांचाच गळा ! प्रकृती अद्यापही चिंताजनक

अकोला दिव्य न्यूज : बंदी घालण्यात आलेल्या चायनीज मांजाची खुलेआम विक्री केली जात असताना, याकडे अर्थपूर्ण डोळे झाकून असलेले पोलीस विभाग आज हादरले असून कर्तव्यावर निघालेल्या एका पीएसआयचा नायलॉन मांजामुळे गळा कापला गेला आहे. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र त्यांची प्रकृती गंभीर आहे. बीड बायपास परिसरातील सुधाकरनगर मध्ये घडलेल्या घटनेत पीएसआय गंभीर जखमी झाल्याने पोलिस अँक्शनमोड येतात की नेहमीसारखं होईल याकडे लक्ष लागून आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमी सचिन पारधे हे स्थानिक गुन्हे शाखेत अधिकारी आहेत. मंगळवारी सकाळी दहा वाजता ते नेहमीप्रमाणे कर्तव्यावर दुचाकीने निघाले होते. सुधाकर नगर मधून जात असतानाच अचानक मांजाने त्यांचा गळा कापला गेला. स्थानिकांनी धाव घेत त्यांना तत्काळ एका खाजगी रुग्णालयात दाखल केले.

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, घटना इतकी गंभीर होती की पारधेच्या गळ्याला मांजा लागताच रक्ताच्या धारा निघाल्या. दुचाकीवरून तोल जाऊन ते खाली कोसळले. मांजा त्यांच्या गळ्यामध्ये अक्षरशः रुतला होता. 


शहानुरमिया दर्गा परिसरातील एका खाजगी रुग्णालयात पारधे यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार त्यांची प्रकृती अद्यापही चिंताजनक आहे. घटनेची माहिती कळतच जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड, अप्पर अधीक्षक सुनील लांजेवार, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक सतीश वाघ यांनी रुग्णालयात धाव घेतली.

३१ गुन्हे तरीही मांजा सुसाट
शहर पोलिसांनी गेल्या दीड महिन्यांमध्ये ३१ गुन्हे दाखल करत ४०० पेक्षा अधिक रील जप्त केल्या. मात्र तरीही शहरात सोशल मीडिया व ऑनलाइन वेबसाईट वरून नायलॉन मांजा खरेदी करण्यात आला. या बेजबाबदार नागरिकांमुळे जवळपास ४० पेक्षा अधिक नागरिक आत्तापर्यंत गंभीर जखमी झाले आहेत.

nylon-rope-finally-on-the-neck-of-the-police-in-chhatrapati-sambhajinagar-psis-throat-cut-condition-critical

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!