अकोला दिव्य न्यूज : राष्ट्रसंतांचे सेवा मंडळ किंवा वारकरी संप्रदाय या दोघांचाही एकच उद्देश, म्हणजे आनंदी समाज निर्माण व्हावा. वारकरी संप्रदायप्रमाणेच राष्ट्रसंतांनी सुद्धा कर्मकांड नाकारले आहे. राष्ट्रसंतांनी विज्ञानवादी दृष्टीकोन समोर ठेवून साहित्य निर्मिती केली आहे. श्रद्धा अजिबात सोडू नका मात्र अंधश्रद्धेला बळी पडू नका. हाच विचार साध्या सहज शब्दात राष्ट्रसंतांनी आपल्या साहित्यातून मांडला आहे. अलीकडच्या काळात देवधर्म ही संकल्पना काहींनी आपल्या स्वार्थापोटी बदलून टाकली आहे. राष्ट्रसंतांच्या विचाराचे किंवा वारकरी संप्रदायाच्या खऱ्या विचाराचे पाईक याला कधीच बळी पडणार नाहीट. आपण जर खरे राष्ट्रसंतांचे खरे अनुयायी असाल तर सतत विवेक बुद्धीने विचार करा आणि राष्ट्रसंतांचा विचार आत्मसात करा,असे प्रतिपादन विचार संमेलनाचे संमेलन अध्यक्ष श्यामसुंदर सोन्नर यांनी आज रविवारी समारोपीय सत्रात अध्यक्षिय भाषणात बोलत होते.
विचारपीठावर संमेलनध्यक्ष श्यामसुंदर सोन्नर तर प्रमुख अतिथी म्हणून मुख्य मार्गदर्शक आचार्य हरिभाऊ वेरूळकर गुरुजी, सुशीलकुमार वणवे, अँड.वंदन कोहडे, महिला सेवाधिकारी संगीता गावंडे, श्रीकृष्ण सावळे गुरुजी, माधवराव सूर्यवंशी, प्रा.डॉ.रोकडे, शुकदास गाडेकर महाराज, राजेंद्र झामरे, गुणवंतराव जानोरकर, ज्ञानेश्वर सुलताने, संजय मतलाने, प्रा.मधु जाधव, श्रीकृष्ण ठोंबरे, उपस्थित होते.
संचालन प्रा. मनीष देशमुख तर आभार ज्ञानेश्वर साकरकर यानी मानले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी सेवा समितीचे गोपाल गाडगे, ज्ञानेश्वर साकरकर, अँड.संतोष भोरे, रामेश्वर पातेखेडे, प्रसाद बरगट, राष्ट्रधर्म युवा मंच जिल्हाध्यक्ष शेखर साबळे, आदित्य टोले, प्रतीक दुतोंडे, सुशांत निलखन, आकाश हरणे, शिवा महाले, प्रल्हाद निखाडे, कोमल हरणे, बरगट आदिनी परिश्रम घेतले. सामुदायिक प्रार्थनेने संमेलनाचा समारोप झाला.