अकोला दिव्य न्यूज : सर्वच समाजात विवाहयोग्य मुला-मुलांच्या विवाहाची समस्या वाढत चालली असून, यावर गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.राजस्थानी समाजातील विविध संस्था आणि गणमान्य लोकांकडून समाज माध्यमातून मुला-मुलींचे बायोडाटा ग्रुप चालविले जात आहेत. अग्रवाल समाज वेल-फेअर ग्रुपने एक पाऊल पुढे टाकत ‘बायोडाटा’ कॉन्फरन्सचा उपक्रम हाती घेतला. ऑनलाईन बायोडाटा परिषदेत अकोला शहर व जिल्ह्यातील गावखेड्यातील अग्रवाल समाजातील तरुण तरुणींच्या पालकांना सहभागी करुन घेण्यात येते.
अग्रवाल समाज वेल-फेअर ग्रुपतर्फे राबविण्यात येत असलेल्या या विनामूल्य अग्रबंधन बायोडाटा कॉन्फरन्सचे उद्घाटन 5 जानेवारीला करण्यात आले. यावेळी पाहुणे म्हणून नरेंद्र बी.अग्रवाल, ओमप्रकाश आर. गोयनका, अँड. दिलीप आर.गोयनका, कमल एस.अग्रवाल, पुरुषोत्तम आर. अग्रवाल आणि अग्रवाल समितीचे अध्यक्ष दीपक गोयनका उपस्थित होते. यावेळी अकोला, चंद्रपूर, चांदूररेल्वे, हिवरखेड, अकोट, शेगाव व अकोला येथील अग्रवाल समाज बंधु-भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
या परिषदेचे आयोजन दर रविवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत करण्यात येणार असल्याचे बजरंगलाल आर. अग्रवाल यांनी दिली आहे. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोला अग्रवाल समाज कल्याण परिवाराचे सर्व सदस्य गेल्या एक महिन्यापासून अथक परिश्रम घेत आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अग्रवाल यांनी सर्वच समाजबांधवांचे आभार मानले.