Tuesday, January 7, 2025
HomeUncategorizedपाटील समाज परिचय मेळाव्यात 762 उपवर मुला-मुलींनी दिला आपला परिचय

पाटील समाज परिचय मेळाव्यात 762 उपवर मुला-मुलींनी दिला आपला परिचय

अकोला दिव्य न्यूज : पाटील समाजातील विवाह इच्छुक जवळपास 762 युवक-युवतींनी हजारो पालकांच्या उपस्थितीत आपला परिचय दिला.पाटील समाज अकोलातर्फे आज पार पडलेल्या मेळाव्यात अकोला जिल्ह्यासह इतरही जिल्ह्यातील 762 उपवर मुला मुलींनी आपला परिचय करून देत नावाची नोंदणी केली. त्यात 412 मुले तर 350 मुलींचा समावेश आहे. आ. रणधीर सावरकर, माजी मंत्री गुलाबराव गावंडे, डॉ. रणजीत पाटील, संग्राम गावंडेसह विविध क्षेत्रातील मान्यवर या मेळाव्यात उपस्थित होते.
प्रारंभी कार्यक्रमास उपस्थित असलेल्या उपवर मुला मुलींच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.

पाटील समाजाचे अध्यक्ष अमानकर यांनी प्रास्ताविकात समाजातील बंधू-भगिनींनी अशा मेळाव्यांमध्ये आपल्या जास्तीत जास्त उपवर मुला-मुलींना सहभागी करावे असे त्यांनी आवाहन केले. मेळाव्यात सहभागी झालेल्या प्रत्येक उपवर मुला मुलीस राजमाता जिजाऊंचा फोटो भेट स्वरूपात देण्यात आला. विविध गावांमध्ये असे मिळावे आयोजित करणारे समाजसेवकसुद्धा यावेळी उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचाही छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला.

अविनाश पाटील यांनी तयार केलेल्या डिजिटल वॉल वर मेळाव्यास उपस्थित राहून न शकलेल्या मुला मुलींचा व्हिडिओ द्वारे परिचय देण्यात आला. विजय बोरकर यांनी तयार केलेल्या योगायोग नामक वेबसाईटचा या मेळाव्यात उद्घाटन करून शुभारंभ करण्यात आला.

अप्रतिम जोडीच्या संयोजिका अर्चना पाटील यांनी वेबसाईट बाबत सविस्तर माहिती दिली. मेळाव्यास प्रत्यक्ष उपस्थित राहून न शकलेल्या मुला मुलींच्या परिचय पत्रांचे याप्रसंगी वाचन करण्यात आले. मेळाव्याचे संचालन अँड. संतोष गावंडे व पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे यांनी केले.

मेळाव्यात चंद्रशेखर पांडे गुरुजी, डॉ. रणजीत कोरडे, विनोद मापारी, पंकज गावंडे, पंकज जायले, मंगेश काळे, सुभाष म्हैसणे, देवराव हागे पाटील, प्रकाश अंधारे, दिवाकर पाटील, जगदीश मुरूमकर, मनीष मोहोड, राम मुळे, गजानन कुटे, राजेश्वर मोंढे, वसंतराव घनोकार, विठ्ठलराव गाडे पाटील, मुरलीधर कुलट, रामेश्वर सपकाळ, नचिकेत चोपडे, सुरेश दहातोंडे पाटील, अभिजीत मुळ, रामभाऊ पाटील, राजेश देशमुख, अँड.संतोष राऊत, अँड.रामप्रकाश ठाकरे, विनायकराव गावंडे, दीपक आखरे, अतुल भुयार, माणिकराव गावंडे, रघुनाथ खडसे, सुरेश पागृत, दत्तात्रेय भाकरेसह गणमान्य नागरिक उपस्थित होते,
या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी पाटील समाजाचे सचिव प्रदीप खाडे, कोषाध्यक्ष राजेंद्र मोहोकार, उपाध्यक्ष विनायकराव शेळके, उपाध्यक्ष सुरेश गाडे, कार्याध्यक्ष सुनील जानोरकर, सहसचिव विजय बोरकर, अविनाश पाटील, मंगेश काळे, देवेंद्र ताले, वैशाली बाहकर, सविता अढाऊ, अँड दिपाली जानोरकर, ज्योती भांबेरे, मनीषा वाघमारे, सृष्टी अमानकर, दिनकरराव सरप डॉक्टर दिलीप मानकर, संजय लुंगे, वासुदेवराव कडू, गजानन हरणे, संदीप महल्ले, अविनाश नाकट, अँड. संतोष गावंडे, विक्रम जानोरकर, शरद पांडे, निलेश पवित्रकार, सागर अमानकर, अतुल अमानकर, दिलीप काकोडे, शैलेंद्र काळे, मधुकरराव महल्ले, रवी साखरे, संदीप निर्मळ, घनश्याम दांदळे, सुभाष निर्मळ, मंगेश पाथरीकर, नाजुकराव गावंडे, वाल्मीक भगत, रवी काटे, रमेश बिहाडे, निवृत्ती पारस्कर, सुधाकर वानखडे, गजानन डिवरे, श्याम कुलट व इतरही सदस्यांनी परिश्रम घेतले. आभार प्रदर्शन राजेंद्र मोहोकार यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!