• म्हैसपूर येथे उभारण्यात येणार शेतकरी भवन•
अकोला दिव्य न्यूज : हिंदू संस्कृतीनुसार पुजा-अर्चा, दान-दक्षिणा आणि कर्मकांड इत्यादी धार्मिक अनुष्ठानसाठी पुण्य पर्व असलेल्या पौष महिन्यात गो-रक्षण व गोसंवर्धनासाठी जोधपूर येथील प्रख्यात गोवत्स पूज्य राधाकृष्ण महाराज यांच्या अमृतमय वाणीत भागवत कथा व महाराष्ट्रातील ख्यातनाम किर्तनकार यांच्या कीर्तनाचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
गो पालन व रक्षणासाठी सतत झटणारे पश्चिम विदर्भातील अग्रेसर असलेल्या अकोला येथील आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्प व सनातनी समाजाच्या सहकार्याने मुंगीलाल बाजोरीया विद्यालयाच्या प्रांगणात गुरुवार दिनांक 9 जानेवारीपासून ते 15 जानेवारी पर्यंत आयोजित या महाउत्सवात सकल समाजाच्या सुदृढ आरोग्य व कल्याणासाठी सुरभी कामधेनु महायज्ञाचे आयोजनही करण्यात आले आहे. अशी माहिती आदर्श गोसेवा व अनुसंधान प्रकल्पाच्या वतीने देण्यात आली.
सुरभी कामधेनू यज्ञाचे मोठे महत्त्व असून या यज्ञाने गोमातेचे संवर्धन व रक्षण होऊन समाजाचे कल्याण होते. म्हणून हा यज्ञ आयोजित करण्यात आला आहे. कथा परिसरात सप्त गो परिक्रमा, तुलादान आदींची व्यवस्था करण्यात आली असून सप्तगो परिक्रमासाठी राष्ट्रात सर्वात लघु गोमाता म्हणून ओळखल्या जाणारी पोंगनुरू जातीची देशी गोमाता उपलब्ध राहणार आहे.
या दरम्यान रोज सायंकाळी सायंकाळी 7-30 ते रात्री 10 वाजेपर्यंत होऊ घातलेल्या राज्यस्तरीय कीर्तन महोत्सवात जळगाव येथील हभप शिवा महाराज बावस्कर, पंढरपूर येथील हभप चैतन्य महाराज देगलूरकर, मानवत येथील हभप उमेश महाराज दशरथे, जिल्ह्यातील हभप संजय महाराज पाचपोर,बार्शी येथील हभप अनिल महाराज पाटील आणि अँड. जयवंत महाराज बोधले कीर्तन सेवा बहाल करणार आहेत. या आयोजनातून म्हैसपूर येथे शेतकरी भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे.
महोत्सव यशस्वीतेसाठी विविध समित्या गठीत करण्यात आल्या असून 2017 नंतर महानगरात प्रथमच मुंगीलाल बाजोरिया विद्यालयाच्या प्रांगणात होत असलेल्या भागवत कथा व कीर्तन महोत्सवाचा समस्त भाविकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुभाष जैन, संस्थापक अध्यक्ष अँड. मोतीसिंह मोहता, आयोजन समितीचे सर्वसेवाधिकारी रमेशभाऊ चांडक,आयोजन समिती अध्यक्ष अँड आशिष बाहेती, गोशाळा समिती अध्यक्ष व आयोजन समितीचे सचिव रवी चांडक, ईश्वरदास महाराज,माहेश्वरी समाज ट्रस्ट अध्यक्ष विजय पनपलिया, संस्थेचे सचिव प्रा विवेक बिडवई, प्रकल्पाचे संचालक सुभाष ढोले,व्यवस्थापक रमाकांत भोपळे आदी उपस्थित होते.