अकोला दिव्य न्यूज : अकोला जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातील ख्यातनाम व्यक्तीमत्व व श्री शिवाजी महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक व ब्राह्मण समाजातील प्रतिष्ठित नागरिक नारायणराव व्यास यांचे आज सोमवार ३० डिसेंबरला वृध्दापकाळाने निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ८७ वर्षांचे होते. अलिकडच्या काही काळापासून प्रकृतीची कुरबुर सुरू होती.आज प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या मागे मुलगा इंजिनिअर शैलेंद्र व्यास, प्राचार्य देवेंद्र व्यास, एक मुलगी, सूना, जावाई आणि नात नातवंडांसह मोठे आप्त परिवार आहे.
आपल्या व्यावसायिक जीवनाची सुरुवात शिवाजी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून शिक्षकी पेशाने करणारे नारायणराव व्यास जितके शिस्तीचे पालन करणारे तेवढेच मनमिळाऊ स्वभावाचे होते. शिवाजी शिक्षण संस्थेसोबत त्यांची जुळलेली नाळ शेवट पर्यंत कायम होती.
त्यांची अंतिम यात्रा उद्या मंगळवार 31 डिसेंबर 2024 रोजी सकाळी 11 वाजता निजी निवास प्रोफेसर काॅलोनी, रणपिसे नगर भागातील प्रोफेसर काॅलनी येथील राहते निवासस्थान ‘देवछाया’ येथून मोठ्या उमरी येथील मोक्षधाम मध्ये त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. अकोला दिव्य कुटुंबासोबत त्यांचे कौटुंबिक संबंध होते.