Friday, December 27, 2024
HomeUncategorized'सिंह' पर्वाचा 'अस्त' ! माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच निधन ; देशाची...

‘सिंह’ पर्वाचा ‘अस्त’ ! माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच निधन ; देशाची मोठी हानी

अकोला दिव्य न्यूज : भारतीय अर्थक्रांतीचे जनक म्हणून नावाजले देशाचे माजी पंतप्रधान आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. मनमोहन सिंग यांनी आज गुरुवार 26 डिसेंबर रोजी एम्स रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला आणि आर्थिक सुधारणेचे जनक म्हणून देशाच्या इतिहासात अजरामर ‘सिंह’ पर्वाचा अस्त झाला. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती नाजूक असल्याने त्यांना एम्सच्या अतिदक्षता विभागात आज रात्री ९.३० वाजताच्या सुमारास दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना रात्री १० वाजताच्या सुमारास मनमोहन सिंग यंदाच्या एप्रिल महिन्यातच राज्यसभेतून निवृत्त झाले होते. यावेळी मल्लिकार्जुन खर्गेंनी त्यांच्या संसदेतील त्यांच्या प्रदीर्घ कारकि‍र्दीचे सढळरित्या कौतुक केले होते. भारताचे अर्थमंत्री म्हणून त्यांची कारकिर्द देशभर गौरवली जाते.

Oplus_131072

३३ वर्षांपूर्वी म्हणजे १९९१ साली डॉ. मनमोहन सिंग यांनी राज्यसभेच्या माध्यमातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि चार महिन्यातच त्यांनी माजी पंतप्रधान पीव्ही नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थमंत्री म्हणून शपथ घेतली होती. देशाच्या अर्थव्यवस्थेला आकार देण्यात त्यांनी महत्वाची भूमिका निभावली आहे. मनमोहन सिंग सध्या ९२ वर्षांचे आहेत आणि त्यांनी सक्रिय राजकारणातून निवृत्ती घेतली आहे. ३३ वर्षे ते खासदार होते.

विद्वान, मृदू, मितभाषी आणि संवेदनशील नेता म्हणून मनमोहन सिंग यांच्याकडे पाहिले जाते. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते; जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यानंतर ते पहिलेच असे पंतप्रधान होते; जे १० वर्षे देशाचा राज्यकारभार सांभाळू शकले. २००४ ते २०१४ असे दहा वर्ष ते देशाचे पंतप्रधान होते. तसेच १९९८ ते २००४ या काळात ते राज्यसभेचे विरोधी पक्षनेतेही होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!