Monday, December 23, 2024
HomeUncategorizedअकोला अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध !अध्यक्षपदी जोशी तर उपाध्यक्षपदी राठी

अकोला अर्बन बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक अविरोध !अध्यक्षपदी जोशी तर उपाध्यक्षपदी राठी

अकोला दिव्य न्यूज: महाराष्ट्रातील अग्रगण्य, मल्टीस्टेट शेड्यूल्ड बँक दि.अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमीटेड,अकोलाच्या संचालक मंडळाची सार्वत्रिक निवडणूक अविरोध होऊन बँकेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संचालक शंतनु शरदचंद्र जोशी तर उपाध्यक्षपदी राहुल चंद्रकांत राठी यांची संचालकांनी एकमताने निवड केली आहे.

संचालक मंडळाची निवडणूक अविरोध झाल्यानंतर नवनिर्वाचित संचालकांची जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या अध्यक्षतेत बुधवार, १८ डिसेंबर रोजी बँकेच्या प्रशासकीय कार्यालयामध्ये सभा संपन्न झाली. या सभेत नवनिर्वाचित संचालकांनी अध्यक्षपदी शंतनू जोशी तर उपाध्यक्ष म्हणून राहुल राठी यांची एकमताने निवड केली या सभेमध्ये सहाय्यक निवडणूक अधिकारी व उपजिल्हाधिकारी पाटील व बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजन सोनटक्के हजर होते.
या सभेपूर्वी संचालकपदासाठी राबविण्यात आलेल्या निवडणूक प्रक्रियेत संचालक मंडळ अविरोध नवनिर्वाचित झाले. नवनिर्वाचित संचालक मंडळामध्ये सर्वसाधारण मतदार संघातून शार्दुल दिगंबर, राहुल गोयनका, शंतनु जोशी, केदार खपली, अॅड. किरण खोत, संजय कोटक, कैलाशनाथ मशानकर, दिपक मायी, अॅड. धनंजय पाटील, राहुल राठी, शाखा प्रतींनिधी मतदार संघातून मोहन अभ्यंकर, माधव बनकर, अजय गांधी, अॅड. अमरीकसिंग वासरीकर, महिला प्रतींनिधी मतदार संघातून सीमा डिक्कर, संगीता गांधी तर अनुसूचीत जाती- जमाती मतदार संघातून प्रमोद शिंदे हे अविरोध निवडून आले आहेत.

अकोला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणूक प्रक्रियेसाठी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपजिल्हाधिकारी विजय पाटील यांनी काम पहिले आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम महाराष्ट्र व मध्य प्रदेश राज्यामध्ये कार्यक्षेत्र असलेल्या 34 शाखांसह अविरत सेवा देणार्‍या बँकेची निवडणूक अविरोध पार पडल्यामुळे जनसामान्यांमधे बँकेची प्रतिमा अधिक भक्कम झाली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!