Sunday, December 22, 2024
HomeUncategorizedपॉपकॉर्नवरही GST ! आता चवीनुसार कर द्यावा लागणार

पॉपकॉर्नवरही GST ! आता चवीनुसार कर द्यावा लागणार

अकोला दिव्य न्यूज : GST On Popcorn taxation with different flavors Nirmala Sitharaman : चित्रपटगृहांमध्ये चित्रपट पाहायला जाणारे बहुसंख्य लोक पॉपकॉर्न देखील खरेदी करतात. पॉपकॉर्न खात चित्रपटाचा आनंद घेतात. मात्र, लोकांचा हा आनंद आता महागणार आहे. राजस्थानच्या जैसलमेर येथे जीएसटी (वस्तू व सेवा कर) परिषदेची ५५ वी बैठक नुकतीच पार पडली. या बैठकीत पॉपकॉर्नवर कर लावण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

परिषदेने पॉपकॉर्नच्या फ्लेवरनुसार (चवीनुसार) त्यावर कर आकारण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच अर्थ वेगवेगळ्या फ्लेवरच्या पॉपकॉर्नवर वेगवेगळा जीएसटी आकारला जाईल. जीएसटी परिषदेने पॉपकॉर्नवर तीन प्रकारचे जीएसटी रेट्स लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. जैसलमेरमध्ये झालेल्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत पॉपकॉर्नवर जीएसटी लावण्याच्या प्रस्तावावर सहमती झाली असून रेडी टू इट पॉपकॉर्नवरील कराबाबत संपूर्ण तपशील जारी करण्यात आला आहे.

मीठ व मसाल्यांचा वापर करून तयार केलेले पॉपकॉर्न जे पॅक केलेलं नसेल आणि ज्यावर लेबल नसेल त्यावर ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. दुसऱ्या बाजूला मीठ व मसाला वापरून तयार केलेले तेच पॉपकॉर्न पॅक केले व त्यावर लेबल लावलं असेल (पॅकेज्ड फ्लेवर्ड पॉपकॉर्न) तर त्यावर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. साखर व फ्लेवर वापरलेले पॉपकॉर्न आणखी महाग होणार आहे. कॅरमेलसारख्या साखरेपासून तयार केलेले पॉपकॉर्न शुगर कन्फेक्शनरी श्रेणीत ठेवण्यात आले असून त्यावर १८ टक्के जीएसटी आकारला जाईल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!