Monday, December 30, 2024
HomeUncategorizedमाजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे निधन

अकोला दिव्य ऑनलाईन : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला यांचे आज सकाळी वयाच्या ८९ व्या वर्षी गुरुग्राम येथील राहत्या घरी त्यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते इंडियन नॅशनल लोक दल (INLD) चे प्रमुख होते. 

मुख्यमंत्री असताना १९९९ ते २००० या काळात चौटाला यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे तीन हजार शिक्षकांची भरती केली. या प्रकरणी सीबीआयने चौटाला आणि या प्रकरणात सहभागी असलेल्या सर्व आरोपींविरुद्ध ६ जून २००८ मध्ये विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. १६ जानेवारी २०१३ रोजी यांच्यासह त्यांचा मुलगा अजय चौटाला व इतर ५३ जणांना न्यायालयात दोषी ठरविले गेले व अटक करण्यात आली. २२ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने यांना दहा वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावली होती.  https://www.akoladivya.com/national/former-haryana-chief-minister-om-prakash-chautala-passes-away-at-89-age

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!