Thursday, December 19, 2024
HomeUncategorizedअखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेतर्फे उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर

अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेतर्फे उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन सादर

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्रीपदी असताना एकनाथ शिंदे यांनी विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ जाहीर केल्याबद्दल नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेच्या वतीने शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. यासोबतच, विणकर आर्थिक विकास महामंडळ त्वरित कार्यान्वित करण्याबाबत, आवश्यक असलेला अधिकारी आणि कर्मचारी वर्गाची नियुक्ती आणि मंडळास निधी उपलब्ध करून देणे, अध्यक्ष आणि अशासकीय सदस्यांची मंडळावर नेमणूक करणे इत्यादी मागण्या तातडीने मंजूर करण्यात याव्यात अशी मागणी करण्यात आली. यासाठी उपमुख्यमंत्री शिंदे यांना लेखी निवेदन देण्यात आले.

एसबीसी संवर्गाच्या विविध समस्यांबाबत जातीने लक्ष केंद्रित करून न्याय द्यावा अशी विनंती शिष्टमंडळातर्फे उपमुख्यमंत्री शिंदे यांना करण्यात आली. परभणी येथील माजी खासदार सुरेश जाधव यांच्या नेतृत्वात अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे प्रदेशाध्यक्ष सतीश दाभाडे यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा सन्मान केला.

यावेळी परभणी येथील अखिल महाराष्ट्र कोष्टी समाज परिषदेचे राज्य खजिनदार विष्णू भाऊ कुटे, विदर्भ उपाध्यक्ष विलास गोरख, विदर्भ संघटक, नरेंद्र माहुरे, सांगली जिल्ह्याचे सरचिटणीस विष्णुपंत रोकडे, नागपूर जिल्हा अध्यक्ष रवी भाऊ जुमले उपस्थित होते. भेटीच्या प्रसंगी एकनाथ शिंदे यांनी समाजाच्या सर्व समस्यांचे लवकरच निदान करण्यात येईल अशी ग्वाही शिष्टमंडळास दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!