अकोला दिव्य ऑनलाईन : सज्जनगड येथून समर्थ रामदासस्वामी यांच्या चरण पादुकांचे उद्या गुरुवार १९ डिसेंबरला दुपारी ५ वाजता श्रीराम मंदिर रामदासी मठ, सुभाष चौक अकोला येथे आगमन होतं आहे. येथून पादुकांची मिरवणूक काढण्यात येईल आणि सुभाष चौक, रॉयल बेकरी, अग्रसेन चौक आणि नाना उजवणे यांच्या घरासमोरून ही मिरवणूक पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालयात येथे पोहोचेल. पार्थसारथी शुक्ल मंगल कार्यालयात शुक्रवार दिनांक २० डिसेंबरपासून दररोज सकाळी काकड आरती, सकाळी ८ ते १२ विविध भागात भिक्षा फेरी,दुपारी ३ वाजता भजन, सायंकाळी ६ ते ९ वेळेत समर्थभक्त अमय गुणे बुबा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे.
श्रीराम मंदिर रामदासी मठ येथे यासाठी नियोजन करण्यासाठी बैठक घेण्यात आली. या बैठकीत वैद्यकीय व्यवस्था, भोजन व्यवस्था कीर्तन व्यवस्था व कार्यालय व्यवस्था ठरविण्यासोबतच मिरवणुकीची जबाबदारी सुद्धा सोपविण्यात आली आहे. पद्य पूजेकरीता श्री समर्थ पादुका कोठे व कोणाकडे, कोणत्या दिवशी न्याव्यात यांचं वेळापत्रक तयार केले आहे.
तसेच भिक्षा फेरी शुक्रवार २० रोजी रामदास पेठ, गड्डम प्लॉट, राधाकिसन प्लॉट, जठारपेठ तर २१ डिसेंबरला जोगळेकर प्लॉट , ज्ञानेश्वर नगर, फडके नगर, वानखडे नगर दि २२/१२/२०२४ गोडबोले प्लॉट, रेणुका नगर, आश्रय नगर २३ डिसेंबरला कौलखेड, खेतान नगर, केशव नगर, परिवार कॉलोनी २४ डिसेंबरला अगरवेश , गणपती गल्ली, शिवचरण पेठ , गणेश नगर २५ डिसेंबरला कॉंग्रेस नगर, दत्त कॉलोनी, गौरक्षण रोड, आळशी प्लॉट २६ डिसेंबरला महसूल कॉलोनी, पत्रकार कॉलोनी, आकाशवाणी मागील एरीया, अमानखा प्लॉट २७ डिसेंबरला राउत वाडी, प्रोफेसर कॉलोनी, सुधीर कॉलोनी, चर्तुभुज कॉलोनी या भागात निघणार, असं बैठकीमध्ये ठरविण्यात आले आहे . वरील तारखेला ज्या भागात भिक्षाफेरी येणार आहे. त्यांच्यासोबत पादुकाबरोबर आलेली सज्जनगड वरील रामदासी मंडळी देखील या भागात सांप्रदायिक भिक्षेकरिता येणार आहे. रामदासी मंडळीच्या झोळीत गहू, तांदूळ, डाळ व द्रव्य अर्पण करून समर्थ सेवेचे श्रेय संपादन करा. जमा भिक्षा सज्जनगड येथे दररोज होणाऱ्या अन्नदानांसाठी वापरली जाते.
जर कोणाला वरील व्यवस्थेमध्ये सहभागी व्हावयाचे असेल. तसेच कोणाला पद्य पूजनासाठी पादुका घरी न्यावयाच्या असेल त्यांनी श्रीराम मंदिर रामदासी मठ सुभाष चौक अकोला येथे संपर्क करावा. असे आवाहन सज्जनगड वरून समर्थ भक्त योगेशबुवा रामदासी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड यांनी केले आहे.