Wednesday, December 18, 2024
HomeUncategorizedअनुजा’ झाली शॉर्टलिस्ट! ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; भारताला मोठा धक्का

अनुजा’ झाली शॉर्टलिस्ट! ‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर; भारताला मोठा धक्का

अकोला दिव्य ऑनलाईन : किरण राव दिग्दर्शित ‘लापता लेडीज’ चित्रपटाला भारतात प्रेक्षकांचे व समीक्षकांचे खूप प्रेम मिळाले होते. भारताकडून ‘लापता लेडीज’ ऑस्करसाठी अधिकृत एंट्री म्हणून पाठवला होता. मात्र, हा चित्रपट ऑस्करच्या शर्यतीतून बाद झाला आहे. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने (AMPAS) बुधवारी सकाळी ही घोषणा केली. त्यामुळे भारताला ‘लापता लेडीज’साठी ऑस्कर मिळण्याची आशा संपली आहे.

‘लापता लेडीज’ ऑस्करमध्ये या कॅटेगरीत सिलेक्ट करण्यात आलेल्या १५ चित्रपटांच्या यादीत स्थान मिळवू शकला नाही. आता या टॉप १५ चित्रपटांपैकी पाच चित्रपटांना ऑस्करसाठी शॉर्टलिस्ट केले जाईल आणि त्यापैकी एका चित्रपटाला पुरस्कार मिळेल

२९ चित्रपटांमधून निवडला गेलेला ‘लापता लेडीज’
९७ व्या अकादमी पुरस्कारांसाठी म्हणजेच ‘ऑस्कर २०२५’ साठी भारताकडून ‘लापता लेडीज’ची निवड करण्यात आली होती. सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय ( विदेशी ) चित्रपट श्रेणीसाठी ‘लापता लेडीज’ चित्रपट भारताने पाठवला होता. फिल्म फेडरेशनकडून लापता लेडीजसह एकूण २९ चित्रपट पाठवण्यात आले होते. यात रणबीर कपूरचा ‘ॲनिमल’, कार्तिक आर्यनचा ‘चंदू चॅम्पियन’, प्रभासचा ‘कल्की 2898 एडी’, मल्याळम चित्रपट ‘आट्टम’, राजकुमार रावचा ‘श्रीकांत’ या २९ चित्रपटांमधून ‘लापता लेडीज’ची निवड समितीने केली होती. नितांशी गोयल, प्रतिभा रांता, स्पर्श श्रीवास्तव, छाया कदम, रवी किशन, आणि गीता अग्रवाल शर्मा यांच्या या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका होत्या.

अनुजा’ झाली शॉर्टलिस्ट
‘लापता लेडीज’ ऑस्करच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी गुनीत मोंगा कपूर निर्मित लाइव्ह-ॲक्शन शॉर्ट फिल्म ‘अनुजा’ शॉर्टलिस्ट झाली आहे. ही शॉर्ट फिल्म वस्त्रोद्योगातील बालमजुरीच्या समस्येवर भाष्य करते. यामध्ये नागेश भोसलेसह अनेक कलाकार आहेत.

ब्रिटनचा भारतीय चित्रपट झाला शॉर्टलिस्ट
ब्रिटनची सह-निर्मिती असलेला व यावर्षी ऑस्करसाठी त्यांची अधिकृत एंट्री असलेला भारतीय पार्श्वभूमीवरील ‘संतोष’ चित्रपट शॉर्टलिस्ट झाला आहे. ब्रिटिश-भारतीय चित्रपट दिग्दर्शक संध्या सुरीचा ‘संतोष’ची चित्रपट ब्रिटिश अकादमीने ऑस्करच्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म श्रेणीसाठी यूकेकडून पाठवला होता. हा चित्रपट हिंदी भाषेत चित्रीत केलेला आहे. यात शहाना गोस्वामी मुख्य भूमिकेत आहे. सुनीता राजवार, संजय बिश्नोई, कुशल दुबे आणि इतर कलाकारांनी या सिनेमात सहायक भूमिका केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!