अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला शहराने शैक्षणिक क्षेत्रात आपली ओळख निर्माण केली असून, विद्यार्थ्यांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून दिले आहे. साई मुलींच्या वसतिगृहाने एक विशेष स्थान मिळवले आहे. “घरापासून दूर घर” या भावनेने सुरू झालेले हे वसतिगृह विद्यार्थिनींना केवळ सुरक्षित राहण्याचे वातावरणच देत नाही तर त्यांना एका कुटुंबाची ऊब आणि आधारही देते. जवळपास 16 वर्षांपूर्वी अनुराधा आणि डॉ.आशिष बाहेती यांच्या प्रयत्नातून 1 मार्च 2008 रोजी SAI मुलींचे वसतिगृह सुरू झाले आणी आज 16 वर्षात मुलींना ‘घरापासून दूर आपलं घर’ झाले आहे.
वसतिगृहाची स्थापना व्यावसायिक दृष्टीपेक्षा सामाजिक संवेदनेतून करण्यात आली. गेल्या 16 वर्षात हे वसतिगृह हजारो विद्यार्थिनींचे घर बनले आहे, जे विविध जिल्ह्यातून आणि ग्रामीण भागातून येथे शिक्षण घेण्यासाठी येतात. याला विशेष बनवणारी वैशिष्ट्ये : वसतिगृह सीसीटीव्ही कॅमेऱ्यांनी पूर्णपणे सुसज्ज आहे, नेहमी सुरक्षा सुनिश्चित करते. घरगुती शैलीतील उच्च दर्जाचे आणि शुध्दता पुर्ण जेवणं, अभ्यासासाठी उत्तम वातावरण,प्रेरक विचार आणि वैयक्तिक लक्ष, पिण्याच्या पाण्यासाठी RO, कपडे धुण्याची सुविधा आणि आरोग्य सेवा चोवीस तास उपलब्ध आहेत.
साई गर्ल्स हॉस्टलने अकोल्यात प्लॅटिनम, डायमंड, गोल्ड आणि सिल्व्हर या चार शाखा स्थापन केल्या आहेत. प्रत्येक शाखेत विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेची, स्वच्छता आणि सोईची पूर्ण काळजी घेण्यात आली आहे. मुली घरापासून दूर अभ्यासासाठी जातात तेव्हा पालकांना मोठी चिंता असते. ती त्यांची सुरक्षितता आणि सोयीची. साई मुलींच्या वसतिगृहाने ही चिंता दूर केली.
प्रत्येक विद्यार्थिनीला आज स्वप्न वाटेल असे वातावरण तयार केले आहे. जर तुमची मुलगी अकोल्यात शिक्षणासाठी येत असेल तर तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी ‘साई गर्ल्स हॉस्टेल’ हा सर्वोत्तम पर्याय आहे. आजच बुक करा आणि त्याचे शिक्षण आणि सुरक्षितता सुनिश्चित करा.