अकोला दिव्य ऑनलाईन : अखेर राज्यातील जनतेची महायुती सरकारच्या विस्ताराची प्रतीक्षा आज संपली आणि १० दिवसांनी आज १५ डिसेंबरला नागपुरात महायुती सरकारचा विस्तार झाला. महायुतीच्या एकूण ३९ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र भाजप मंत्र्यांची नावे बघितले तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची पकड घट्ट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्र्वासातील जवळपास सर्वच आमदारांना बाहेर ठेवण्यात आले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील आ.संजय कुटे यांचा समावेश १०० टक्के होणार असं वाटतं असताना भाऊसाहेब फुंडकर यांचे पुत्र आमदार आकाश फुंडकर यांना दिलेली संधी आणि या सोबतच नितेश राणे, पंकजा मुंडे, संजय सावकारे यांचा कॅबिनेट मंत्री म्हणून झालेल्या समावेश धक्का देणारा आहे.यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी देखील धक्का दिला आहे. कधीकाळी शरद पवार यांच्या विश्वासू राहिलेले छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांना बाहेर ठेवून अजित पवार यांनी आपल्या विश्वासू ५ आमदारांना स्थान दिले आहे.
माजी मुख्यमंत्री शिंदे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत बंडाचा झेंडा हाती घेणारे दिपक केसरकर, तानाजी सावंत आणि अब्दुल सत्तार यांना मंत्रिपद दिले नाही तर संजय राठोड यांना कॅबिनेटमध्ये घेऊन आपला हेतू स्पष्ट केला आहे.
महायुतीच्या ३९ नेत्यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. फडणवीसांच्या मंत्रिमंडळात आता भाजपाच्या २० शिवसेनेच्या (शिंदे) १२ व राष्ट्रवादीच्या (९) मंत्र्यांचा समावेश आहे. आज ३३ कॅबिनेट मंत्र्यांनी शपथ घेतली. तर सहा आमदारांना राज्यमंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यापूर्वी देखील राज्यात महायुतीचं सरकार होतं. मात्र, नव्या सरकारमध्ये काही नवे चेहरे पाहायला मिळणार आहेत. नव्या सरकारमध्ये भाजपाने नऊ, शिवसेनेने (शिंदे) सहा व राष्ट्रवादीने (अजित पवार) पाच नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
भाजपाच्या २० मंत्र्यांची यादी
1 देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री
2 चंद्रकांत पाटील कॅबिनेट मंत्री
3 मंगलप्रभात लोढा कॅबिनेट मंत्री
4 राधाकृष्ण विखे पाटील कॅबिनेट मंत्री
5 पंकजा मुंडे कॅबिनेट मंत्री
6 गिरीश महाजन कॅबिनेट मंत्री
7 गणेश नाईक कॅबिनेट मंत्री
8 चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री
9 आशिष शेलार कॅबिनेट मंत्री
10 अतुल सावे कॅबिनेट मंत्री
11 संजय सावकारे कॅबिनेट मंत्री
12 अशोक उईके कॅबिनेट मंत्री
13 आकाश फुंडकर कॅबिनेट मंत्री
14 जयकुमार गोरे कॅबिनेट मंत्री
15 शिवेंद्रराजे भोसले कॅबिनेट मंत्री
16 नितेश राणे कॅबिनेट मंत्री
17 जयकुमार रावल कॅबिनेट मंत्री
18 माधुरी मिसाळ राज्यमंत्री
19 मेघना बोर्डीकर राज्यमंत्री
20 पंकज भोयर राज्यमंत्री
शिवसेनेच्या मंत्र्यांची यादी
१. एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री
२. गुलाबराव पाटील कॅबिनेट मंत्री
३. दादा भूसे कॅबिनेट मंत्री
४. संजय राठोड कॅबिनेट मंत्री
५. उदय सामंत कॅबिनेट मंत्री
६. शंभूराज देसाई कॅबिनेट मंत्री
७. संजय शिरसाट कॅबिनेट मंत्री
८. प्रताप सरनराईक कॅबिनेट मंत्री
९. भरत गोगावले कॅबिनेट मंत्री
१०. प्रकाश आबिटकर कॅबिनेट मंत्री
११. आशिष जैस्वाल राज्यमंत्री
१२. योगेश कदम राज्यमंत्री
राष्ट्रवादीच्या (अजित पवार)
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
हसन मुश्रीफ
दत्तात्रय भरणे
आदिती तटकरे
माणिकराव कोकाटे
नरहरी झिरवाळ
मकरंद जाधव
इंद्रनील नाईक
माणिकराव कोकाटे https://www.akoladivya.com/nagpur/big-news-maharashtra-cabinet-expansion-list-of-39-ministers-sworn-in-devendra-fadnavis-government