Wednesday, December 18, 2024
HomeUncategorized'प्रभात' च्या 'यज्ञ कुंड' नाटकाने पटकाविला बाल नाट्य स्पर्धेचा 'विश्वास करंडक'

‘प्रभात’ च्या ‘यज्ञ कुंड’ नाटकाने पटकाविला बाल नाट्य स्पर्धेचा ‘विश्वास करंडक’

मला पण बालपण हवय’ द्वितीय व ‘जगाओ मेरा देश’ तृतीय


अकोला दिव्य ऑनलाईन : विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेत अकोला येथील प्रभात किड्स स्कुलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘यज्ञ कुंड’ नाटकाने प्रथम क्रमांक मिळवून विश्वास करंडक पटकाविला. आरडीजी पब्लिक स्कूलच्या ‘मला पण बालपण हवय’ या नाटकाने द्वितीय तर पातुर येथील एज्युविला पब्लिक स्कूलच्या ‘जगाओ मेरा देश’ या नाटकाने तृतीय क्रमांक पटकाविला. जिल्हाधिकारी अजित कुंभार यांच्या हस्ते हस्ते दीप प्रज्वलित करून पुरस्कार सोहळ्याला सुरुवात करण्यात आली. व्यासपीठावर महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. मधु जाधव, निमंत्रक प्रशांत गावंडे, प्रसिद्धी प्रमुख प्रदीप खाडे तसेच स्पर्धेचे परीक्षक धनंजय देशपांडे, यतीन माजिरे उपस्थित होते.

जिल्हाधिकारी कुंभार आपल्या भाषणात म्हणाले की, बालकांमधील कलागुणांना वाव देण्यासाठी ही विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धा केवळ अकोल्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात पसरली पाहिजे. त्या माध्यमातून अनेक चांगले बालकलावंत तयार होऊन त्यांनी राज्यात व देश पातळीवर आपले नाव उज्वल केले पाहिजे. येत्या तीन ते सहा महिन्यात अकोल्यातील नवीन नाट्यगृहाचे काम पूर्ण करण्यात येईल. तसेच नाट्य प्रशिक्षणाकरिता शिक्षकांना आर्थिक मदत करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी आवर्जून सांगितले.

स्पर्धेचे परीक्षक धनंजय सरदेशपांडे व निमंत्रक प्रशांत गावंडे यांनी मनोगत व्यक्त केले. या स्पर्धेत अतिथींच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले. नवीन संहितेकरिता उत्कृष्ट लेखकाचा पुरस्कार सॉरी नाटका करिता कांचन पटोकार यांना देण्यात आला. उत्कृष्ट नेपथ्यासाठी प्रथम पारितोषिक ‘जगावो मेरा देश’च्या केशव चोपडेकर यांना, द्वितीय पारितोषिक दिव्यांगो का संघर्ष च्या समीक्षा मोहोकार व तमन्ना अग्रवाल यांना देण्यात आला. तृतीय पारितोषिक ‘योजना बाईचा विकास’ या नाटकाकरिता राजवीर दुर्गे यांना देण्यात आला. उत्कृष्ट संगीताचे प्रथम पारितोषिक पंकज खराबे, द्वितीय पारितोषिक नेहांशू ठाकरे तर तृतीय पारितोषिक नंदकिशोर डंबाळे यांना देण्यात आले. उत्कृष्ट प्रकाश योजने करिता प्रथम पारितोषिक सचिन जाधव यांना, द्वितीय पारितोषिक विनोद भालतिलक तर तृतीय पारितोषिक हर्षल ससाने यांना देण्यात आले.

उत्कृष्ट वेशभूषेकरीता ठेवण्यात आलेले प्रथम पारितोषिक यज्ञ कुंड नाटकाच्या दिनेश पाटील व मुक्ता धुमाळे यांना, द्वितीय पारितोषिक प्रणाली हात वळणे, स्नेहल बिडकर, किरण कोगदे व ज्योती तिवारी यांना तर तृतीय पारितोषिक अर्पिता भगत, व महेश वाडेकर यांना देण्यात आले.
मुलांकरीता असलेल्या उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक रुद्र कुकडकर, द्वितीय पारितोषिक सुजय पिसे तर तृतीय पारितोषिक सोहम पंडितकर यास देण्यात आले. मुलींकरिता उत्कृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक अनया कुऱ्हे, द्वितीय पारितोषिक आराध्या चिंचोळकर तर तृतीय पारितोषिक अष्टिका ठाकरे हिला देण्यात आले. सादरीकरणासाठी उत्तेजनार्थ प्रथम पारितोषिक चम चम चमको तर द्वितीय पारितोषिक असं कसं या नाटकास देण्यात आले.
उत्तेजनार्थ पारितोषिक ओजस्वी कडू, सक्षम पांडव, तनवी काकड, ओवी चिने, अर्णव काळे, स्नेहल ताले, प्रणिता जाधव, अनुष्का देशपांडे, आराध्या डांगे, काव्या खंबाळकर, प्रांजल गावंडे, सार्थक घाटे, अनुष्का काळे, अनाम साजिद कमानी, मोहित वाठुरकर, किंजल फाफेरीया, समिधा काकड, किंजल पालखेडे, रुद्र जानो कार, जानवी मस्के, धनश्री पांडे, अर्णव केने, अर्णव गाडगे, श्रद्धा जिरापुरे, इच्छा एडणे व परी गुप्ता यांना देण्यात आले.

कार्यक्रमास अशोक ढेरे, सुनील गजरे, अरुण घाटोळ, अविनाश पाटील, रवी अरबट, अनिल कुलकर्णी, प्राचार्य प्रतिभा फोकमारे, स्नेहल गावंडे, विष्णू निंबाळकर, प्रदीप अवचार, सय्यद वासिफ, रितेश महल्ले, अंकुश इंगळेसह विविध शाळांमधील पालकवर्ग मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन अक्षय राऊत यांनी केलं.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!