अकोला दिव्य ऑनलाइन : माहेश्वरी समाजातील प्रतिष्ठित नागरिक आणि दोनद येथील प्रगतिशील कास्तकार मदनलाल जयनारायण लटुरिया यांचे आज शनिवार १४ डिसेंबरला सकाळी वृध्दापकाळात निधन झाले. मृत्यू समयी त्यांचं वय ८८ वर्षाचे होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, सुन, जावाई आणि नातं-नातवंडासह मोठं आप्त कुटुंब आहे. अकोला जनता बॅंकेचे सेवानिवृत्त अधिकारी आणि श्री माहेश्वरी समाज सेवा संघाचे संस्थापक सदस्य व अंकेक्षक, तसेच माहेश्वरी समाज ट्रस्टचे अंकेक्षक अनिल लटुरिया यांचे ते वडील आहे.
जिल्ह्यातील दोनद येथील मुळ निवासी आणि शेतकरी कुटुंबातील मदनलाल लटुरिया अलिकडच्या काही वर्षांपासून अकोला येथे स्थायी झाले होते. मात्र शेती व भावासोबत त्यांची नाळ शेवट पर्यंत जुळली होती. शांत, सुस्वभावी आणि धार्मिक वृत्तीचे मदनलाल जयनारायण लटुरिया गावातील सर्व समाजात सलोख्याचे संबंध ठेवून होते. वयोमानानुसार काही दिवसांपासून प्रकृतीची कुरबुर सुरू झाली असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला.
त्यांची अंतिम यात्रा आज शनिवार दिनांक १४ डिसेंबर२०२४ रोजी सकाळी ११ वाजता त्यांचे रहते निवासस्थान १०२, गजानन प्लाजा, तोष्णीवाल ले-आउट, अकोला येथून मोहता मिल मोक्षधाम साठी निघणार आहे.