Thursday, December 19, 2024
HomeUncategorizedगुल्लेरकार नरेंद्र इंगळे उवाच !माणसाला माणूस म्हणून पाहण्याची ज्ञानप्राप्ती हीच खरी शिकवण

गुल्लेरकार नरेंद्र इंगळे उवाच !माणसाला माणूस म्हणून पाहण्याची ज्ञानप्राप्ती हीच खरी शिकवण

अकोला दिव्य ऑनलाईन : देव देवळात नसून माणसातच आहे आणि माणसाला माणूस म्हणून पाहण्याची ज्ञानप्राप्ती हिच खरी शिकवण असल्याचे मत सुप्रसिद्ध लेखक,हास्य प्रबोधनकार गुल्लेरकार नरेंद्र इंगळे यांनी व्यक्त करीत उपस्थित विद्यार्थ्यांना अंतर्मुख केले. अकोला येथील कृषी महाविद्यालयद्वारा आयोजित तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन निशिगंध 2024 चे उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते. आपल्या खुमासदार आणि विनोदी शैलीत विद्यार्थ्यांचे विनोदातून प्रबोधन करताना नरेंद्र इंगळे यांनी आजच्या युवा पिढीला सामाजिक जाणीव जबाबदाऱ्यांची आठवण करून देतं तरुणाईच्या मनात घर केले.

तीन दिवसीय वार्षिक स्नेहसंमेलन निशिगंध 2024 चे उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी सांगितले की, महाविद्यालय प्रवेशाचे वेळी एकाही कला, क्रीडा प्रकाराचे अंग नसणारा माझ्या सारखा विद्यार्थी महाविद्यालयीन शिक्षणाच्या अंतिम वर्षी विद्यापीठ चॅम्पियन होऊ शकतो. यातूनच आत्मविश्वास, जिद्द, चिकाटी व मेहनत प्रदर्शित होते. ते पुढे म्हणाले की स्नेहसंमेलनाचे माध्यमातून नेतृत्व विकास साध्य होत असून व्यक्तिमत्व विकासाचा पाढा या ठिकाणीच गिरावीला जातो असे नमूद करतांना डॉ गडाख यांनी आपल्या पाल्याचे कौशल्य पालकांनी देखील अनुभवावे या हेतूने दर दोन वर्षातून एकदा विद्यार्थी-पालक- शिक्षक मेळावा आयोजित करून पालकांना महाविद्यालयात बोलवा असे देखील आयोजकांना सूचित केले.

महाविद्यालयीन जीवनात वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या उपजत कलागुणांना वाव देणारे व्यासपीठ असून कृषी महाविद्यालय अकोला द्वारा 66 व्या वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 13 ते 15 डिसेंबर दरम्यान करण्यात आले आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांचे अध्यक्षतेत संपन्न या स्नेहसंमेलनाचे उद्घाटन प्रसंगी सुप्रसिद्ध हास्य कवी गुल्लेर फेम नरेंद्र इंगळे यांच्या विशेष उपस्थितींसह उद्यानविद्या महाविद्यालयांचे अधिष्ठाता डॉ. देवानंद पंचभाई, कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुरेंद्र काळबांडे, निम्न कृषि शिक्षण शाखेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र काटकर, कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे, विद्यापीठ नियंत्रक प्रमोद पाटील, जिमखाना उपाध्यक्ष डॉ. मोहन तोटावार, प्रा डॉ. राजेंद्र वाळके, विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकांत बोरके व मल्लिका ताजने आदीची व्यासपीठावर उपस्थिती होती,

तसेच मंदाकिनी शरद गडाख, कुलगुरूंचे तांत्रिक सचिव डॉ. नितीन कोष्टी, विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. किशोर बिडवे यांचे सह कृषी महाविद्यालयाचे सर्व विभाग प्रमुख, प्राध्यापक, अधिकारी- कर्मचारी, विद्यार्थी- विद्यार्थिनी बहुसंख्येने उपस्थित होते.
कृषी क्रांतीचे प्रणेते स्व. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे प्रतिमेचे माल्यार्पण तथा दीप प्रज्वलनाने प्रारंभ झालेल्या या उद्घाटन समारंभाचे प्रसंगी महाविद्यालय जिमखाना उपाध्यक्ष डॉ. मोहन तोटावार यांनी जिमखाना अहवाल सभागृहाला सादर केला. तर
कृषि महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे यांनी स्वागतपर प्रास्ताविकात बोलतांना विद्यार्थ्यांच्या सुप्तगुणांना वाव देण्याचे स्नेहसंमेलन सशक्त माध्यम असून दिक्षारंभ या नावीन्यपूर्ण अभिनव उपक्रमाद्वारे यंदाच्या स्नेहसंमेनलात प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्यांना देखील कला गुण सादरीकरण करता येणार असल्याचे उपस्थितांना अवगत केले.

विद्यार्थी प्रतिनिधी श्रीकांत बोखरे यांनी मनोगताद्वारे अहवाल वाचन केले. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन विद्यार्थी प्रतिनिधी संपदा डोके व साहिल मोगरे यांनी केले. वार्षिक स्नेहसंमेलन निशिगंध 2024 चे यशस्वी आयोजनासाठी अधिष्ठाता कृषि डॉ. श्यामसुंदर माने यांचे मार्गदर्शनात कृषी महाविद्यालय अकोलाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. राजेंद्र गाडे व त्यांचे सहकारी प्रा. डॉ. राजेंद्र वाळके, डॉ.वीरेंद्र ठाकूर, डॉ. मनोज मारावार, डॉ. दिलीप धुळे, डॉ. गिरीष जेऊघाले, डॉ.सुधीर दलाल, डॉ. प्रकाश कहाते,डॉ. संतोष दिवेकर, डॉ. अनिल खाडे, डॉ. वैभव उज्जेनकर, डॉ. योगिता सानप, डॉ. गोदावरी गायकवाड, डॉ. वर्षा आपोतिकर, डॉ. विवेक खंबालकर, डॉ. सारिका मोरे, डॉ. प्रेरणा चिकटे, डॉ. प्रविणा सातपुते, डॉ. साजिद, डॉ.अरुणा काटोले, डॉ. अतुल झोपे, डॉ. अतुल वऱ्हाडे, डॉ. गणेश भगत, डॉ. संजय कोकाटे,लेखाधिकारी समीर अहमद यांचे सह सर्वं अधिकारी – कर्मचारी वर्ग अथक परिश्रम घेत आहेत

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!