अकोला दिव्य ऑनलाईन : संसाराचा गाडा हाकत असताना अनेकदा माणूस चिंताक्रांत होतो. अनेक विचारांनी दौलानमय अवस्था निर्माण होते तेव्हा मनाची एकाग्रता वाढवण्यासाठी नामस्मरण वा नामजप एक समर्थ साधन आहे. भगवंताच्या नामस्मरणाने मनावरील ताबा मजबूत करण्यासाठी सतत नामस्मरण करीत राहावे यासाठी मागील १६ वर्षांपासून नामस्मरणाचा प्रचारासाठी प्रतिवर्ष श्री संत गजानन महाराजांची पायदळ वारी, दिंडी व पालखी सोहळा आयोजीत करण्यात येतो.
दरवर्षी प्रमाणे यंदाही अकोला येथील शास्त्री नगर भागातील राजे शिव छत्रपती मंडळातर्फे रविवार 15 डिसेंबरला संत गजानन महाराजांच्या पायदळ वारी, दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.रविवारी सकाळी ६ वाजता जय गजानन चौक, शास्त्री नगर, आकाशवाणी मागे, अकोला येथुन शेगांवसाठी निघणार असलेल्या या सोहळ्यात भक्तांनी सहभागी होवुन शाश्वत आनंदाची अनुभुती घ्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
सोहळ्यात सहभागी होऊ इच्छित भाविकांनी नाव नोंदणी करीता 738 531 4747 / 898 375 7576 / 986 011 9779 / 982 203 4233 / 963 765 7222 / 968 970 1253 या मोबाईल नंबरवर संपर्क साधावा. सोहळ्यात सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे अनिवार्य, अशी माहिती राजे शिव छत्रपती मंडळाचे पिंटू टेकाडे यांनी दिली आहे.