अकोला दिव्य ऑनलाईन : रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी संजय मल्होत्रा यांची निवड करण्यात आली आहे. ११ डिसेंबर पासून पुढील तीन वर्षांसाठी त्यांचा कार्यकाळ असणार आहे. कॅबिनेटच्या समितीने त्यांची महसूल सचिव पदी असलेल्या संजय मल्होत्रा यांची निवड रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरपदी केली आहे. ANI या वृत्तसंस्थेने हे वृत्त दिलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रिझर्व्ह बँकेचे 26वे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा कार्यकाळ 3 वर्षांचा असेल. विशेष म्हणजे, केंद्र सरकारने 2022 मध्येच संजय मल्होत्रा यांना रिझर्व्ह बँकेचे संचालक म्हणून नियुक्त केले होते. आता त्यांच्याकडे RBI च्या गव्हर्नरपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोण आहेत संजय मल्होत्रा?
संजय मल्होत्रा हे राजस्थान केडरचे 1990 च्या बॅचचे IAS अधिकारी आहेत. नोव्हेंबर 2020 मध्ये ते REC चे अध्यक्ष आणि MD झाले होते. याआधी त्यांनी ऊर्जा मंत्रालयात अतिरिक्त सचिव पदावरही काम केले आहे. संजय मल्होत्रा यांनी आयआयटी कानपूरमधून अभियांत्रिकीची पदवी घेतली असून, प्रिन्स्टन विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण केले आहे. गेल्या 30 वर्षांपासून मल्होत्रा यांनी ऊर्जा, वित्त, कर, आयटी आणि खाण यांसारख्या महत्वाच्या खात्यांमध्ये काम केले आहे.