अकोला दिव्य ऑनलाईन : संपूर्ण देशात भारतीय जनता पार्टीला वाढवण्याचे श्रेय तपस्वी नेते लालकृष्ण आडवाणी यांना असून संपूर्ण देशामधील सिंधी समाज भारतीय जनता पार्टी सोबत जुळला आहे.नुकताच झालेल्या निवडणुकीत अपक्ष उमेदवाराने चुकीची आकडेवारी सांगून फक्त मलाच मतदान करा कारण माझे राजकीय नुकसान केले गेले आहे.अशाप्रकारे दिशाभूल केली.पण सिंधी समाजाने नेहमी प्रमाणे भाजपाला साथ दिली, ही गोष्ट भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते कधीच विसरू शकत नाही.येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत भाजपासोबत उभे राहा.असे प्रतिपादन विजय अग्रवाल यांनी केले.
स्थानिक गायत्री भवनात आयोजित सिंधी समाज आणि भाजप कार्यकर्त्या संवाद कार्यक्रमात ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की सिंधी समाजाची नेहमीच भाजपाला साथ असून केंद्रासह आता राज्यात देखील भाजपा सरकार स्थापन झाली आहे. अकोला शहर व जिल्ह्यातील विकासासाठी मी सतत प्रयत्नशील असून यापुढे अधिक वेगाने काम करीत राहणार आहे. असे अग्रवाल यांनी आश्वासन दिले.
संवाद बैठकीमध्ये प्रमोद कृपलानी, दीप मनवाणी, प्रकाश आनंदानी आणि कन्हैया आहूजा यांनी आपले विचार व्यक्त केले.
संवाद बैठकीत आपल्या भावना व्यक्त करीत विनोद मनवाणी यांनी भाजपाने सिंधी समाजाला दिलेल्या विविध सवलती आणि यासाठी केलेल्या कामाची माहिती देताना सांगितले की या सर्व घडामोडीत विजय अग्रवाल अग्रभागी होते.यासाठी त्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रमात भाजपा सक्रिय कार्यकर्ता नानकराम राजपाल, मोहन नागवानी, हरीश मनवानी, जय संतवानी, संजय नागदेव, आकाश पंजवानी, सुरेंद्र नाथानी, राहुल पारवानी, कोणील मनवाणी, अनिल परवानी, विजय छतानी, नरेंद्र भाटिया, आशीष जस्वासवाणी, सुंदर भाटिया, विशाल मनवानी, प्रेम आनंदानी, जयंती कावना, आशीष पंजवानी, कमल सचदेव, हरीश राजपाल, कमल रंगवानी, सुरेश कावना, मुकेश टहलरामानी, राम आहूजा, रोहित बालचंदानी, रमेश लछवानी, किशन सैनानी, सुरेश वाधवानी, करन कावना, उधवदास आडवाणी, रवि समाज, अशोक आहूजा, गिरीश छावले उपस्थित होते.