Wednesday, December 4, 2024
HomeUncategorizedमहाराष्ट्राचे दुसऱ्यांदा प्रतिनिधि करणार शोएब गाडेकर ! स्वर्ण पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत

महाराष्ट्राचे दुसऱ्यांदा प्रतिनिधि करणार शोएब गाडेकर ! स्वर्ण पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेत

अकोला दिव्य ऑनलाईन : राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेत शोएब गाडेकरने सलग दुस-यावर्षी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राज्यातुन प्रथम स्थान पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बाँक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे गाडेकर प्रतिनिधित्व करणार आहे.

  • क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन 22 ते 27 नोव्हेंबर 2024 दरम्यान करण्यात आले होते. या स्पर्धेत 19 वर्षे वयोगटात शाह बाबू ज्युनिअर कॉलेज पातुर येथे इयत्ता 12वीं मध्ये शिकत असलेला शोएब गाडेकरने सलग दुस-या वर्षीही आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत राज्यातुन प्रथम स्थान पटकावत सुवर्णपदक प्राप्त केले. यामुळे दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय शालेय बाँक्सिंग स्पर्धेत तो महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.
  • त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे सीईओ इसहाक राही, शारिरीक शिक्षण निर्देशक फिरोज अन्सारी,यांनी अभिनंदन केले असुन शोएब गाडेकर हा जिल्हा क्रीडा अधिकारी तथा बॉक्सिंगचे राज्य क्रीडा मार्गदर्शक सतीश चंद्र भट्ट, सहायक क्रीडा प्रशिक्षक गजानन कबीर, आदित्य मने आदिच्या मार्गदर्शनात नियमित प्रशिक्षण घेत आहे. या यशाबद्दल त्याच्या सर्वत्र कौतुक होत आहे.
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!