Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedमोठी बातमी ! एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी रवाना : नाराजीनाट्य की वेगळे...

मोठी बातमी ! एकनाथ शिंदे साताऱ्यातील गावी रवाना : नाराजीनाट्य की वेगळे काही?

अकोला दिव्य ऑनलाईन : महायुतीला स्पष्ट आणि प्रचंड बहुमत मिळूनही मुख्यमंत्री आणि खातेवाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री कोण होणार? हे ठरविण्यासाठी चार दिवसांचा कालावधी गेल्यानंतर आता खातेवाटपावरून नाराजी दिसून येत आहे. शिवसेनेने (शिंदे) गृह खात्यावर दावा ठोकला आहे. तर भाजपाकडून या दाव्यावर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. दरम्यान काल गुरूवार दि. २८ नोव्हेंबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर राज्यातील महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक संपन्न झाली.

त्यानंतर आज मंत्रिमंडळाच्या खातेवाटपासंदर्भात मुंबईत महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळ गावी गेल्याची बातमी समोर येत आहे. इंडिया टुडेने दिलेल्या बातमीनुसार एकनाथ शिंदे हे साताऱ्यासाठी निघाल्यामुळे महायुतीची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे.

दिल्लीतील अमित शाह यांच्याबरोबर झालेल्या बैठकीनंतर महायुतीचे नेते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे मुंबईत परतले होते. त्यानंतर आज मुंबईत खातेवाटपासंदर्भात महत्त्वाची बैठक होणार होती. मात्र आता ही बैठक पुढे ढकलण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा निर्णय भाजपा पक्षश्रेष्ठींवर सोपविल्यानंतर शिवसेनेकडून (शिंदे) गृहमंत्री पदावर दावा केला जात होता. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट हे उघडपणे गृहखाते एकनाथ शिंदेंकडे द्यावे, ते कायदा व सुव्यवस्था राखण्यास सक्षम व्यक्ती आहेत, असे भाष्य केले होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!