अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विदर्भातील सर्वांत मोठी औद्योगिक वसाहत आणि शैक्षणिक व व्यावसायिक बाजारपेठ असलेल्या अकोला जिल्ह्याचा विकास खुंटला आहे. अलिकडच्या अडीच वर्षांत नावापुरतेच पालकमंत्री होते. तर मागील अनेक वर्षांपासून शहर व जिल्ह्याबाहेरील पालकमंत्री मिळतं असल्याने फक्त नियोजन समितीच्या बैठकीचे सोपस्कार आणि 15 ऑगस्ट, 26 जानेवारी व 1 मे महाराष्ट्र दिनानिमित्त झेंडा फडकविणारेच पालकमंत्री मिळाले. कधीकाळी विकासाच्या वाटेवर असलेल्या अकोला जिल्ह्याला पुन्हा विकासाच्या मार्गावर आणणे गरजेचे झाले आहे. तेव्हा नव्या मुख्यमंत्र्यांनी यासाठी अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात विजयाची ‘हॅटट्रीक’ करणारे आणि मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर तिसऱ्यांदा 50 हजारांहून अधिक मताधिक्य घेणारे रणधीर सावरकर यांना मंत्रीमंडळात घेऊन खास अकोला जिल्हा पालकमंत्रीपदाची जबाबदारी द्यावी, अशी मागणी अकोला जिल्हावासींयसह शेतकरी, उद्योजक, व्यवसायीकांकडून केली जात आहे.
अकोला जिल्हा भाजपाचा गड असून यंदाही भाजपला मोठी साथ दिली आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात अवघ्या काही मतांनी पराभव पत्करावा लागला असला तरी मिळालेले मतदान लक्षणिय आहे. अकोला पश्चिम मतदारसंघात आ. सावरकर यांनी केलेली विकासकामे आणि मतदारांच्या आवश्यक प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी वेळप्रसंगी अधिका-यांनाही धारेवर धरुन सर्वसामान्य माणसाला दिलासा दिला. शेतकऱ्यांचा समस्या मार्गी लावण्यासाठी आणि कृषी योजनांचा लाभ देण्यात आ.सावरकर सर्वात पुढे आहेत. लोकसभा निवडणूकीत त्यांच्या नियोजन व व्युहरचनेमुळे भाजप उमेदवार अनुप धोत्रे विजयी झाले.
अकोला शहर व जिल्ह्याचा नियोजनबध्द पध्दतीने विकास व्हावा यासाठी अकोलेकर डोळे लावून वाट बघत आहेत. तेव्हा पश्चिम विदर्भातील या महत्त्वाच्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास घडवून आणण्याची जबाबदारी आ.सावरकर यांच्यावर सोपवण्यात यावी, अशी अपेक्षा वजा मागणी नव्या मुख्यमंत्र्यांनी पुर्ण करून अकोला जिल्ह्यावासीयांना न्याय द्यावा.