अकोला दिव्य ऑनलाइन : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणूक कार्यक्रमांतर्गत अकोला जिल्ह्यातील अकोट, बाळापूर,अकोला पश्चिम, अकोला पूर्व व मुर्तिजापूर विधानसभा मतदार संघासाठी 20 नोव्हेंबर 2024 रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या दिनांक 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजतापासून सर्व संबंधीत मतदार संघाच्या ठिकाणी करण्यात येणार आहे. सकाळी ८ वाजता सर्वप्रथम टपाली मतपत्रिकांची मोजणी सुरु होणार असून सकाळी ८.३० वाजता पासून EVM मतदान यंत्रावरील (CU) मतमोजणी सुरु होईल.
अकोट विधानसभा निवडणुकीतील EVM वरील मतांची मोजणीसाठी 14 टेबलावर 25 फेरी, बाळापूर विधानसभा निवडणुकीतील मतांची मोजणीसाठी 12 टेबलावर 29 फेरीत,
अकोला पश्चिम विधानसभा निवडणुकीत EVM वरील मतांची मोजणी 14 टेबलावर एकुण 22 फेरीत पुर्ण करण्यात येणार आहे.अकोला पुर्व विधानसभा निवडणुकीत EVM वरील मतांची मोजणी 14 टेबलावर एकुण 26 फेरीत पुर्ण करण्यात येणार आहे. मुर्तिजापूर विधानसभा निवडणुकीत EVM वरील मतांची मोजणी 14 टेबलावर एकुण 28 फेरीत वर नमुद केल्यानुसार मतमोजणी करण्यात येणार आहे. प्रत्येक टेबल वर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1मतमोजणी सहायक 1 सुक्ष्म निरिक्षकाची नेमणूक करण्यात आलेली आहे.
मतमोजणी केंद्राचे ठिकाण:
अकोट : गोदाम क्रमांक 5, कृषी उत्पन्न बाजार समिती, अकोट
बाळापूर शासकीय धान्य गोदाम क्रमांक 1, खामगाव रोड, बाळापूर
अकोला (पश्चिम) शासकीय गोदाम क्र.1 जिल्हाधिकारी कार्यालय
अकोला (पूर्व) शासकीय गोदाम क्र. 2, जिल्हाधिकारी कार्यालय
मुर्तिजापूर शासकीय गोदाम SDO कार्यालयाजवळ, मुर्तिजापूर.
पोलीस बंदोबस्त : अकोला जिल्ह्यातील 5 विधानसभा मतदार संघाकरीता १०१६ पेक्षा अधिक पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे प्रत्येक मतदार संघाचे मतमोजणी केंद्राचे ठिकाणी 1-CAPF प्लाटून व 1-SRPF प्लाटून नियुक्त करण्यात आलेले आहे.
प्रत्येक मतमोजणी केंद्राचे ठिकाणी त्रीस्तरीय बंदोबस्त लावण्यात आलेला असून मतमोजणी केंद्राचे ठिकाणी येणा-या प्रत्येक व्यक्तीस त्यांचे व्दारे तपासणी करुनच मतमोजणी केंद्रामध्ये प्रवेश दिला जाणार आहे.
त्यामध्ये पहिला स्तर हा स्थानिक पोलीसांचा असून हा मतमोजणी केंद्राचे 100 मीटर अंतरावर राहील. दुसरा स्तर हा मतमोजणी कक्षाचे बाहेर प्रवेशव्दाराजवळ त्याठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे कर्मचारी कार्यरत राहतील तसेच तीसरा स्तर हा मतमोजणी कक्षाचे प्रवेश्व्दारावर राहणार त्याठिकाणी केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाचे जवान कार्यरत राहणार आहेत. सदर दुस-या व तिस-या स्तराचे ठिकाणी तपासणी करीता पोलीस विभागाकडून बसविण्यात आलेल्या Metal Detector तपासणी यंत्राव्दारे तपासणी करण्यात येईल.
मतमोजणी निरिक्षक : अकोट-उदयन मिश्रा, IAS बाळापूर –अमित कुमार, SCS अकोला (पश्चिम) गिरीषा पी.एस., IAS
अकोला (पूर्व) श्रीरामुलू, SCS मुर्तिजापूर (अ.जा.) नरहरी सिंह बांगेर, IAS