अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत ‘हायव्होलटे सीट’ पैकी एक आणि मागील ३० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचा गड असणाऱ्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात आज शांतपणे मतदान पार पडले असून मागील २०१९ मध्ये झालेल्या मतदानाच्या टक्केवारीच्या तुलनेत सायंकाळी ५ वाजता यंदा तब्बल 3 टक्क्यांनी मतदानात वाढ झाली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत सरासरी ५४.४५ टक्के मतदान झाले. त्यानंतरच्या एका तासात सरासरी ६ टक्के मतदान होण्याची शक्यता आहे. सहा वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी रात्री १० वाजेपर्यंत जाहीर करण्यात येईल असे अधिकारीक सुत्रांनी सांगितले आहे.
सहा वाजता मतदान केंद्रांचे गेट बंद केल्यावर मतदान केंद्राच्या आत असलेल्यांचे मतदान जवळपास पार पडले असून या तासाभरात हा आकडा साठच्या वर जाणार आहे. हे नक्की झाले असले तरी अधिकृत टक्केवारी रात्री १० वाजेपर्यंत येण्याचे सुत्रांनी सांगितले आहे.
गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात ५१ टक्क्याच्या जवळपास मतदान झाले होते. तर या मतदारसंघात मतदानाचा ५ वाजेपर्यंतचा आकडा पाहता यंदा ६० टक्के मतदान होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यंदा एकुण मतदान ९ टक्क्यांनी वाढण्याची चिन्हे आहे.असे झालेच तर जादाचे झालेले हे मतदान कोणाच्या पारड्यात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात की सत्ताधाऱ्यांच्या बाजुने असेल याचे अंदाज लावले जाणार आहेत.
अकोला पश्चिम मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५४. ४५ टक्के तर यासोबतच अकोला पुर्व मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५१.२८ टक्के आणि बाळापूर मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५८.३० टक्के आणि अकोट मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ५७.६० टक्के आणि मुर्तिजापूर मतदारसंघात ५ वाजेपर्यंत ६०.८ टक्के मतदान झाले आहे. तुलनेत कमी मतदान झाले आहे. असे असले तरी बहुतांश मतदारसंघांत चांगले मतदान झाले आहे.
अकोला जिल्ह्यातील ५ विधानसभा मतदारसंघात ५ वाजता झालेल्या मतदानात सर्वाधिक मतदान मुर्तिजापूर येथे तर सर्वात कमी मतदान अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात झाले आहे. विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रात मागील वर्षी झालेल्या निवडणुकीत ६१.४४ टक्के मतदान झाले होते. तर यंदाच्या निवडणुकीत सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्रात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्ह्यात ७० टक्क्यांचा अगदी जवळ पोहोचलं आहे.
महाराष्ट्रात ५ वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान गडचिरोली जिल्हा ७० टक्क्यांचा अगदी जवळ पोहोचला आहे. तर त्यापाठोपाठ भंडारा ६५.८८ आणि गोंदिया ६५.०९ चा नंबर लागत आहे. हिंगोली जिल्ह्यानेही ६१.१८ चा आकडा गाठला आहे. जालना ६४.१७ टक्के, कोल्हापूर ६७.९७ टक्के, नंदुरबार जिल्हा ६३.७२, परभणी ६२.७३ टक्के, रायगड ६१.०१, सांगली ६३.२८, सातारा ६४ टक्के, सिंधुदुर्ग ६२ टक्के, वर्धा ६३.५०, यवतमाळ ६१.२२ टक्के मतदान झाले आहे.
सर्वात कमी असलेल्या जिल्ह्यांत मुंबई, ठाणे आणि पुणेकरांचा समावेश आहे. ठाणे ४९.७६, मुंबई शहर ४९.०७, मुंबई ५१.७६, पुणे ५४.०९ या जिल्ह्यांत इतर जिल्ह्यांच्या तुलनेत कमी मतदान झाले आहे.
काही लक्षवेधी फोटो : सर्व छायाचित्रे जुने शहरातील : छायाचित्रकार निरज भांगे.