अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम मतदारसंघातील अपक्ष आणि वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत पुरस्कृत उमेदवार हरिश आलीमचंदानी यांनी प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात प्रचारात आघाडी घेतली असून काल काढलेल्या रॅलीत मतदारांचा उत्साह व पाठींबा शिगेला पोहचल्याने या मतदारसंघात यंदा चमत्कार घडेल असे चित्र दिसत असून आले.रॅलीत वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते व पदाधिकारी, जुने शहरातील नागरिक आणि हरीश आलिमचंदानी यांचे समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने रॅलीला जणू जत्रेचे स्वरूप आले होते. तेव्हा उमेदवार हरिशभाई आलिमचंदानी लोकांना दिसत नसल्याने सहभागी मतदारांनी त्यांना खांद्यावर घेतले. आता फक्त विजयाची औपचारीकताच शिल्लक असल्याचे मत यावेळी व्यक्त केले जात होते.
जुने शहरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी येथील जकात नाका येथून प्रचार रॅली काढण्यात आली आणि बघता बघता रॅलीला जत्रेचे स्वरूप मिळाले.जुने शहरातील जकात नाका येथून निघालेली रॅली श्रीवास्तव चौक, अगरवेस पेट्रोल पंप,,भीमनगर आखाडा, रमाबाई चौक येथुन मार्गस्थ होत असताना रॅलीत लोकांनी हरिशभाई यांना खांद्यावर उचलून घेतले. तर हरिशभाई यांनी संवाद साधत नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या.
रविवारची सुटी असल्याने अनेकांनी सहभागी होऊन आपल्या तक्रारी मांडल्या.रॅलीमध्ये मतदारांची संख्या वाढतच गेली. हजारो समर्थकांच्या उपस्थिती मध्ये हरिशभाई यांचा चेहरा मतदारांना दिसत नव्हता.आलीमचंदानी यांनी शहरासाठीचा योजना आणि भविष्याचा दृष्टिकोन ठेवून विकासाची ब्लू-प्रिंट तयार केली आहे.यासोबतच आपले मत योग्य उमेदवाराला गेले पाहिजे, यासाठी आलिमचंदानी मतदारांना आवाहन करीत आहे.
आज खुल्या प्रचाराचा शेवटचा दिवस असून आता अंतर्गत घडामोडी अधिक वेगाने होईल आणि उद्या चित्र स्पष्ट होणार आहे. मात्र अकोला पश्चिम मतदारसंघात आलिमचंदानी यांना मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता, यंदा या मतदारसंघातील महासंग्रामात चमत्कार घडेल अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे.