अकोला दिव्य ऑनलाईन : विधानसभा निवडणुकीसाठी खुल्या प्रचाराच्या आज १८ नोव्हेंबर रोजी शेवटच्या दिवशी अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी जाहीररीत्या पुरस्कृत केलेले मतदारांचे अर्थात लोकांचे उमेदवार हरीश आलीमचंदानी यांच्या नेहरू पार्क जवळील प्रचार कार्यालयापासून दुपारी १२ वाजताच्या सुमारास बाईक रॅलीला सुरुवात झाली. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे युवा नेतृत्व सुजाण प्रकाश आंबेडकर सहभागी झाल्याने बाईक रॅलीत नवं चैतन्य निर्माण झाले होते. रॅलीत शेवटपर्यंत देण्यात आलेल्या ‘हरीश भाई आगे बढो’ ना-याने पश्चिम मतदारसंघ दणाणले होते.
नेहरू पार्क येथून गोरक्षण रोड, मलकापूर, केशव नगर, कौलखेड, सिंधी कॅम्प, अशोक वाटिका, नवीन बसस्थानक समोरुन गांधी रोड, कापड बाजार, मानेक टॉकीज, माळी पुरा, दगडी पूल, भीमनगर, डाबकी रोड, कॅनॉल रोड, बाळापूर नाका, शिवसेना वसाहत, वाशिम बायपास मार्गे, हरिहर पेठ, जयहिंद चौक, मोठे पूल, खोलेश्वर, राजपूत पुरा, जिल्हाधिकारी कार्यालय मार्गे आलीमचंदानी यांच्या प्रचार कार्यालयात येऊन या ठिकाणी बाइक रॅलीचा समारोप करण्यात आला.
अँड प्रकाश आंबेडकर यांचे विश्वासू सहकारी मनोहर पंजवानी तसेच वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी मोटार सायकल रॅलीचे नेतृत्व केले.ही रॅली पाहून प्रतिस्पर्धी उमेदवारांचे धाबे दणाणले आहेत. बाईक रॅलीत मतदारांनी मोठ्या प्रमाणात सहभागी होऊन पाठिंबा दिला, त्यामुळे २० नोव्हेंबर रोजी मतदानाच्या दिवशी गॅस शेगडी या निवडणूक चिन्हाचे बटन दाबून हरीश भाई यांना मतदान करण्याचा संकल्प केल्याचे दिसून येते. गॅस शेगडी या निवडणूक चिन्हा समोरील बटण दाबून हरीशभाईंना प्रचंड मताधिक्याने विजयी करणार असल्याचा मतदारांनी दावा केला आहे.