Thursday, December 26, 2024
HomeUncategorizedमोठी बातमी ! महाविकास आघाडीला पाठींबा ; सकल मराठा समाजाचा एकाभिमुख निर्धार

मोठी बातमी ! महाविकास आघाडीला पाठींबा ; सकल मराठा समाजाचा एकाभिमुख निर्धार

अकोला दिव्य ऑनलाईन : सकल मराठा समाजाच्या सभेत एकाभिमुख निर्धार करत महाविकास आघाडीला जाहीर पाठींबा दिला आहे. या पाठींब्याने महाविकास आघाडीच्या उमेदवारांना प्रचंड पाठबळ मिळाले असून उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून आणून महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापित करावे असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले.

जिल्हा परिषद कर्मचारी भवन येथे विधानसभा निवडणुकीचे संदर्भात विचार विनिमय करून निर्णय घेण्यासाठी सकल मराठा समाजाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेमध्ये सकल मराठा समाजातील सामाजिक, राजकिय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या प्रमाणात हजर होते. या सभेत समाजातील जेष्ठ मान्यवर, प्रतिष्ठित नागरिक, विविध सामाजिक संस्थांचे जिल्हाध्यक्ष, पदाधिकाऱ्यांनी शांतपणे समाजपयोगी विचार मांडत भूमिका जाहीर केली.

भाजप महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा खेळखंडोबा केला, शेतीमालाला भाव न देणे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या व पिळवणूक करणे, जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ, बहुजनांना शिक्षणापासून व आरोग्य सेवेपासून वंचित ठेवणे, अदाणी व अंबानी ‌‌यांच्यासारख्या अनेक उद्योगपतींचे अब्जावधींचे कर्ज माफ करणे, भारताचे संविधानाची पायमल्ली करणे, आरक्षण संपुष्टात आणणे, नागरिकांच्या हक्क व अधिकारांवर गदा आणणे या मुद्यावर सर्व मान्यवरांनी प्रखर विचार मांडले. या सर्व बाबींवर उपाय म्हणून भ्रष्टाचाराने बरबटलेल्या भाजप व महायुती सरकारला सत्तेवरून खाली खेचणे व काँगेस महाविकास आघाडीला निवडून आणा असे आवाहन करण्यात केले.

यावेळी समाजाच्या सर्वच पदाधिकारी व नेत्यांनी निर्धार करत महाविकास आघाडीला जाहीर पाठींबा दिला आहे. सकल मराठा समाजातील प्रत्येक घटकांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करून भरघोस मतांनी निवडून आणावे व महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार स्थापित करावे असे आवाहनही करण्यात आले.

महायुतीच्या उमेदवारांना मतदान करू नका !
वेळोवेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या आणि
सकल मराठा समाजाचे आरक्षण, हक्क अधिकारांवर गदा आणण्याचे काम भाजपा, महायुतीने केले आहे. मराठा समाजाने वेळोवेळी आंदोलन, उपोषण करूनही समाजांच्या प्रश्नांची दखल घेण्यात आली नाही. उलट मराठा समाजाला आरक्षणाची झळ सोसावी लागत आहे. या गोष्टीचा लक्षात घेता भाजपा, महायुतीच्या उमेदवारांना मतदान करू नये, अशी भूमिका सकल मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आली आहे.
भाजपा कार्यकर्त्यांचा गोंधळ हाणून पाडला !
सकल मराठा समाजाची बैठकीत उपस्थित असलेल्या काही भाजप कार्यकर्त्यांनी गोंधळ घालून सभा उधळण्याचा प्रकार केला. समाज बांधवांनी हा प्रकार हाणून पाडला व त्यानंतर अतिशय शांततेत सभा पार पडली. भाजप कार्यकर्त्याच्या या कृतीचा उपस्थित जेष्ठ मान्यवरांनी निषेध व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!