Friday, December 27, 2024
HomeUncategorizedमहायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना लोकतांत्रिक जनाधार पार्टीचा बिनशर्त पाठिंबा

महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना लोकतांत्रिक जनाधार पार्टीचा बिनशर्त पाठिंबा

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्या कुप्रचारामुळे राजकीय परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यात अकोला महानगरात अशा व्यक्तीस उमेदवारी दिली की ज्यामुळे अकोला शहरात तेढ निर्माण होवुन अशांतता पसरुन कायद्या आणि सुव्यवस्था बिघडू शकते.अकोला शहरात अशी परिस्थिती निर्माण होवु नये यासाठी अकोला जिल्हा लोकतांत्रिक जनाधार पार्टीकडुन महायुतीचे उमेदवार विजय अग्रवाल यांना बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे.

अकोला शहरासाठी महाराष्ट्र विधानसभेकरीता योग्य प्रतिनिधी नियुक्त करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याकरीता अकोला पश्चिम मतदार संघातून भारतीय जनता पार्टीचे अधिकृत उमेदवार म्हणुन अग्रवाल यांना निवडून आणणे अत्यंत गरजेचे झाले आहे. मागील ३० वर्षापासुन स्व.गोवर्धन शर्मा यांचा वारसा व भाजपाची विचारसरणी विजय अग्रवाल सक्षमपणे पुढे घेऊन जाणार अशी अपेक्षा व्यक्त करीत अकोला जिल्हा लोकतांत्रिक जनाधार पार्टीने पाठिंबा जाहीर केला असल्याचे पत्रात नमूद केले आहे.

आमच्या आशा आकांक्षा व अपेक्षा पूर्ण कराल यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने आपला प्रचार प्रसार करण्यासाठी सर्वस्वी प्रयत्न करु, असं पत्रात नमूद केले आहे. यापत्रावर प्रदेश अध्यक्ष दिनेश श्रीवास, अकोला जिल्हा अध्यक्ष गजानन वाघमारे आणि शहर सचिव शाम त्रिपाठी यांच्या स्वाक्षरी आह

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!