Saturday, December 13, 2025
No menu items!
No menu items!
Homeजनतेचे उमेदवार हरीश आलीमचंदानींच्या प्रचाराचा हिंगणा रोड व बुद्ध विहारात झंझावात !...

जनतेचे उमेदवार हरीश आलीमचंदानींच्या प्रचाराचा हिंगणा रोड व बुद्ध विहारात झंझावात ! घेतल्या समस्या जाणून

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीने अधिकृत पाठिंबा दिलेले जनतेचे उमेदवार हरिश आलीमचंदानी यांचा प्रचाराचा झंझावात आज बुद्ध विहारात होता. यावेळी बुद्ध विहारात समाजाला भेडसावणाऱ्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी १०० टक्के प्रयत्न करणार आहे असे आश्वासन आलिमचंदानी यांनी दिले.

स्थानिक नागरिकांशी संवाद साधत आलिमचंदानी यांनी समस्या जाणून घेतल्या. हिंगणा रोड भागातील आणि एस.टी वर्कशॉपच्या बाजूच्या बुद्ध विहारात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासोबतच शहराचा विकास साधण्याचे आश्वासन दिले. या दरम्यान वेळेचा अभाव असताना देखील भिरड वाडी येथे आयोजित कॉर्नर सभेत हजर होऊन हरीशभाईनी नागरिकांचा उत्साह वाढविला. शहरासाठी विकासात्मक योजना राबवून भविष्याचा दृष्टिकोन ओळखून विकासाची ब्लू-प्रिंट तयार केली आहे अशी माहिती आलीमचंदानी यांनी दिली.

निवडणुकीमध्ये आपले मत योग्य उमेदवाराला गेले पाहिजे यासाठी त्यांनी मतदारांना साद घातली. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात मतदारांचा वाढता प्रतिसाद बघता मला विजयाची १०० टक्के खात्री असल्याचा विश्वास हरिष आलीमचंदानी यांनी यावेळी व्यक्त केला.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!