अकोला दिव्य ऑनलाईन : भाजप शासनामुळे उत्तर भारतीय समाजाच्या कल्याणासाठी अनेक उपाययोजना राबविल्या गेल्या आहेत आणि भविष्यातही त्यांची प्रगती व सुरक्षिततेसाठी भाजप कटिबद्ध आहे. उत्तर भारतीय समाज नेहमीच भाजपच्या सोबत असून येणाऱ्या 20 तारखेला अकोला लोकसभा मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवारांना मतदान करुन विजयी करा असे आवाहन अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल यांनी केले.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अकोला येथील एका हॉटेलमध्ये उत्तर भारतीय महासंघाकडून संवाद बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार विजय अग्रवाल तसेच अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघातील उमेदवार व आमदार रणधीर सावरकर यांनी उत्तर भारतीय महासंघातील पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस रणधीर सावरकर, खा.अनुप धोत्रे,भाजप महानगर अध्यक्ष जयंतराव मसने, आ.वसंत खंडेलवाल, राम प्रकाश मिश्रा, अनुप शर्मा, अरविंद शुक्ला, दिलीप मिश्रा,चेतन भार्गव, सुजित ठाकूर, संतोष पांडे, विजय ठाकूर, अनिल यादव, धर्मेंद्र यादव, मनोजसिंह बिसेन, मनीष सिंह बसेन, विनोद ठाकूर, अमरेश शुक्ला, कृष्णा पांडे, मनोज साहू, विजय ठाकूर, रवी यादव आधी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.