अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला पश्चिम मतदार संघात वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत उमेदवार हरिश आलीमचंदानी त्यांच्या सर्वसमावेशक विकासाच्या भुमिकेमुळे अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासोबत संपूर्ण शहरात परिचित असल्याने आणि उभ्या जीवनात समाजसेवा करीत असल्यामुळे अकोला पश्चिम मतदार संघातील निवडणुकीत आलिमचंदानी यांनी लोकप्रियतेसोबतच प्रचारात आघाडी घेतली आहे.
वंचित बहुजन आघाडीने त्यांना जाहीर पाठींबा दिल्याने हरिशभाई वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक मैदानात आल्यावर यंदाची निवडणूक सर्वांचे आडाखे चुकीचे ठरवले, अशी मतदारसंघात चर्चा आहे. त्यांच्या लोकप्रियतेमुळे हिंगणा रोड, वाठूरकर लेआऊट भागात नारी शक्तीसह मतदारांनीच हरिशभाई यांची निवडणूक हाती घेतली असल्याचे चित्र दिसून आले.
आता मोजके दिवस राहीले असून अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातील नारी शक्ती भक्कमपणे आलिमचंदानी यांच्या पाठीशी उभी आहे. पहिल्याच एका अपक्ष उमेदवाराने वंचित बहुजन आघाडीच्या पाठींब्याने मोठं आव्हान उभं केलं आहे. विशेष म्हणजे ठीक ठिकाणी महिला औक्षण करून हरीश आलिमचंदानी यांना त्यांच्या विजयाची खात्री देत आहे.