Thursday, December 26, 2024
Homeराजकारणपंतप्रधान मोदींना अकोला भाजप विधी आघाडीतर्फे संयोजक अँड ठाकुर यांनी दिला निरोप

पंतप्रधान मोदींना अकोला भाजप विधी आघाडीतर्फे संयोजक अँड ठाकुर यांनी दिला निरोप

अकोला दिव्य ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी अकोला शिवणी विमानतळावरुन नांदेडसाठी प्रयाण करताना, अकोला भारतीय जनता पक्ष विधी आघाडीचे संयोजक आणि ख्यातनाम विधीज्ञ अँड. सुभाष सिंह ठाकुर यांनी मोदींना भावपूर्ण निरोप दिला. पंतप्रधान मोदी यांनी अँड ठाकुर यांची आस्थेवाईकपणे विचारपूस केली.

अकोला जिल्ह्यातील भाजप महायुतीच्या उमेदवारांसाठी अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पटांगणावर आयोजित प्रचार सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. त्यांनंतर दुपारी नांदेड येथे आयोजित सभेला ते संबोधित करणार असल्याने शिवणी विमानतळावरुन त्यांनी सर्वांचा निरोप घेतला. यावेळी अकोला येथील राजपूत समाज आणि महाराणा प्रताप प्रगतिशील मंडळाचे अध्यक्ष आणि अकोला भाजप विधी आघाडीचे संयोजक अँड एस.एस.ठाकूर यांनी भावपूर्ण निरोप दिला.

निरोप देताना, विमानतळावर अँड. सुभाषसिंह ठाकूर तसेच डॉ. किशोर मालोकार, कृष्णा पांडे, मनोज शाहू, गणेश सपकाळ, विठ्ठल सरप , प्रतीक झुनझुनवाला, चंदा लव्हाळे, रुपाली काकडे, डॉ. अभय जैन आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!