अकोला दिव्य ऑनलाईन : विविध समाजोपयोगी व जनहिताचे उपक्रम राबविणार्या निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाद्वारे रद्दी संकलनातून थॅलेसेमियाच्या 4 रुग्णांना दत्तक घेण्याचा निर्णय घेण्यात आला.रद्दी संकलनातून या चार रुग्णांचा वर्षभर उपचार केला जाणार आहे. या उपचाराच्या खर्चासाठी जमा केलेल्या रद्दीला विकून मिळालेल्या रक्कमेचा धनादेश डॉ. हेडगेवार रक्तपेढीला सुपूर्द करण्यात आला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी पुर्तीवर्षाचे औचित्य साधून डॉ. हेडगेवार रक्तपेढीचे सचिव निलेश जोशी यांच्या उपस्थितीत धनादेश सुपूर्द करण्याचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला महाराष्ट्रातील सर्वात सुंदर शाळा ठरलेल्या प्रभात किड्सचे संचालक डॉ. गजानन नारे, ब्राह्मण सभेचे अध्यक्ष अविनाश देव, ज्येष्ठ नाट्यकर्मी दिलीप देशपांडे, अशोक ढेरे, सचिन राऊत, जयंत सरदेशपांडे, प्रकाश जोशी, निलेश देव, रामहरी डांगे, मिलिंद देव, मंगेश देशमुख, राजू गुन्नलवार, श्रीराम उंब्रेकर, निलेश पवार, राजू कनोजिया, अजय शास्त्री, मंगेश देशमुख, विजय वाघ, सोनू मोटे, रवींद्र मेश्राम, गणेश मैराळ, भास्कर बैतवार, नरेंद्र परदेशी, रमेश खिलोशिया, आशु यादव, शशी हिवरखेडकर, प्रसाद देशपांडे, निलेश हाडोळे, स्वराज बिलबिले, सुनील देशपांडे यांची उपस्थिती होती.
डॉ.हेडगेवार रक्तपेढीने 60 बालकांचे रक्तपालकत्व स्वीकारले आहे. रुग्णांना लागणारे रक्त त्यांच्या गरजेनुसार डॉ. हेडगेवार रक्त केंद्र येथून नि:शुल्क म्हणजेच तपासणी शुल्क न घेता दिल्या जाते. निलेश देव मित्र मंडळाच्या वतीने मागील दहा वर्षांपासून रद्दी संकलित करून दरवर्षी चार ते पाच रुग्णांच्या उपचाराचा खर्च स्वीकारला जातो. आपण समाजाचे काही देणे लागतो या भावनेतून निलेश देव सतत काही ना काही समाजोपयोगी उपक्रम राबवित असतात. मागील एका तपापासून सतत डॉ. हेडगेवार रक्तपेढीसाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले आहे.
सन 2015 मध्ये सुद्धा रक्तपेढीच्या व्यावसायिक वीज देयकाचे घरगुती वीज देयकामध्ये रूपांतर करून दिल्यानंतर महाराष्ट्रातील सर्व रक्तपेढ्यांना व्यावसायिक ऐवजी घरगुती दराने वीज देयक सुरू करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्ह्यात थॅलेसिमिया आजाराने ग्रस्त असलेल्या बालकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या मुलांना दर पंधरा ते वीस दिवसातून रक्त द्यावे लागते. त्यामुळे वर्षाकाठी रक्त चढविण्याचा खर्च मोठ्या प्रमाणात येतो. अनेक पालकांची एवढा खर्च करण्याची आर्थिक परिस्थिती नसते. ही बाब लक्षात घेऊन निलेश देव मित्र मंडळ व ॲड. धनश्री दिवस स्मृती सेवा प्रकल्प द्वारा हा उपक्रम हाती घेण्यात आला. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.