Thursday, November 14, 2024
Homeताज्या बातम्यामतांचा टक्का घसरणार !रिकाम्या गावात प्रचार कोणापुढे करायचा? गावकरी शेतात : उमेदवार...

मतांचा टक्का घसरणार !रिकाम्या गावात प्रचार कोणापुढे करायचा? गावकरी शेतात : उमेदवार पेचात

अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जिल्ह्यातील पाच पैकी चार मतदारसंघात प्रामुख्याने ग्रामीण भाग येतो. अकोला पश्चिम मतदारसंघात पण नजिकचा ग्रामीण मोडतो. मात्र उमेदवार येतात तेव्हा गावात शुकशुकाट दिसून येत असल्याचे चित्र आहे. केवळ मोजके पक्षीय कार्यकर्ते माहिती असल्याने गोळा होतात. चिंतेत पडलेला उमेदवार मग म्हणतो की बोलवा गावकऱ्यांना. तेव्हा एकच सूर उमटतो. गावात कोण नाय, सगळे शेतात. मग भाषण कुणापुढे देणार, अशा चिंतेत उमेदवार पुढे निघतो. हे चित्र ग्रामीण भागात सरसकट आहे.

पक्षाचे पदाधिकारी असल्याने गाव सोडावे लागते. पण त्यामुळे या हंगामातील कामे मागे पडणार, असे पदाधिकारी म्हणतात. चणा, गहू पेरणे सूरू आहे. त्यासाठी कठणा करण्याचे काम आहे. तूर, कापसाला पाणी देण्याचे काम असून काही शेतकरी कापूस वेचणीत गुंतले असल्याने गाव सायंकाळ पर्यंत ओस पडले असते. गत २०१९ मधील विधानसभा निवडणुकीपेक्षा यंदाची निवडणूक दीड महिना उशीरा होत आहे. गतवेळी याच हंगामात म्हणजे दसरा, नवरात्रात निवडणूक झाली होती. त्या काळात सोयाबीन पिक नुकतेच कापणीसाठी आलेले असते.तेव्हा १५ दिवस थोडा निवांत होता. म्हणून त्यावेळी गाव निवडणुकीत सहभागी झाले होते.आता तसा उत्साह दिसून येत नसल्याचे सांगितल्या जाते.

मतदान टक्का यावेळी निश्चित घसरू शकतो, असे निरीक्षण ग्रामीण भागातील मतदारांनी नोंदविले आहे. शेतमजूर कामाला असले तरी ज्याची शेती तो पण कामावर लक्ष ठेवण्यासाठी गाव सोडू शकत नाही. म्हणून सायंकाळी थोडी बहुत वर्दळ दिसून येत असल्याने राजकीय गप्पा झडतात. पण शेती कामांचा परिणाम मतदानवर दिसून येण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे चित्र आहे. पण पुढे कामे कामी होतील, तेव्हा राजकीय वातावरण दिसू शकते. आता सकाळी पाणी ओलायला गेलेला शेतकरी वीज पुरवठा असेपर्यंत घरी येतच नाही. म्हणून हे काम सूरू राहणारच असल्याची स्थिती आहे.

गाव पुढारी जेव्हा प्रचारासाठी विनंती करतो तेव्हा त्यास मुले शेतीवर चाललो, असे स्पष्ट उत्तर देऊन टाकतो.नेता गावात येतो तेव्हा त्यांचे कार्यकर्तेच स्वागतापुरते असतात. इतर फिरकतही  नाही. असे थंड काम पाहून काहींनी युक्ती केली. गावात गाडी पाठवून फिरायला चला म्हटले की काही जमा होतात. तेवढाच प्रचार होत असल्याचे एका उमेदवाराने नमूद केले. एका पक्षाचा गाव पुढारी कामाला लागला की मग विरोधी पक्ष कार्यकर्त्यास पण जाग येते. स्पर्धेतून मग शेतीकामे बाजूला सारून फिरण्याची हौस भागवून घेण्याचा पण प्रकार होत आहे. पण हे कार्यकर्त्या पुरतेच.सध्या मतदार दूरच आहे. अतिवृष्टीने अर्धे पीक गेले आणि उरल्या पिकास भाव नाही. त्यातच शेती कामे असल्याने प्रचारास प्रतिसाद नसल्याचे चित्र दिसून येत असल्याचे नेते सांगतात.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!