अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात बंडखोरी करून मैदानात उतरलेल्या जवळपास ४० बंडखोर नेत्यांवर भाजपा प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेली कारवाई वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. अनेक बंडखोरांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसानंतर पक्षांचं सदस्यत्व आणि पदांचा अधिकृतपणे राजीनामा देऊन निवडून रिंगणात उतरले. तरीही अशा बंडखोरांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. मात्र अकोला येथील हरीश आलिमचंदानी यांना मात्र या कारवाईतून का वगळ्यांत आले , असा प्रश्न विचारला जातो आहे. तर भाजपाच्या निष्ठावंतांमध्ये आश्चर्य आणि असंतोष व्यक्त केला जात आहे.
अमरावती येथील जगदीश गुप्ता आणि तुषार भारतीय यांच्यावर कारवाई करण्यासोबतच अकोट विधानसभा मतदारसंघात बंडखोरी करून उमेदवारी अर्ज दाखल करणारे आणि शेवटच्या दिवशी उमेदवारी अर्ज मागे घेणारे गजानन मोहल्ले यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.अधिकृतरित्या माघार घेतली असताना केलेल्या कारवाईमुळे अकोट तालुका भाजपात आश्चर्य आणि संताप व्यक्त केला जात आहे. भारतीय व गुप्ता यांनी सदस्यांचा त्याग केला असताना देखील कारवाई झाली आहे. तेव्हा हरीश आलिमचंदानी यांनी तर उमेदवारी कायम ठेवून आवाहन केले असताना कारवाई केली गेली नाही.
उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी त्यांच्या मर्जीतील खास विश्वासू विक्की कुकरेजा यांना पाठवून देखील आलिमचंदानी यांनी माघार घेतली नाही तर आता पंतप्रधान मोदी यांची अकोला येथे होऊ घातलेल्या सभेत आलिमचंदानी यांची समजूत काढून समर्थन मिळू शकते काय? ही चाचपणी करण्यासाठी तर कारवाई करण्यात आली नसावी, असा तर्क लावला जात आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’हे बिरुद घेऊन शिस्तबद्ध पक्ष म्हणून घेणा-या भाजपला यंदा बंडखोरीने मोठ्या प्रमाणावर ग्रासले असून, आता भाजपतही पक्षश्रेष्ठींना जुमानता नसल्याचे स्पष्ट झाले आहे. येत्या दोन दिवसात मोदी यांची सभा अकोला येथे होत असून, त्यानंतर काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.