अकोला दिव्य ऑनलाईन : प्रभात किड्स स्कूलने मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-2 मध्ये राज्यस्तरीय प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल 2014 ते 2019 या कालावधीतील माजी विद्यार्थी व शिक्षकांसोबत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यामध्ये या बॅचेसमधील बहुतांश विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
याप्रसंगी जागरुक नागरिक या नात्याने प्रत्येकाने मतदान करून लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान शपथ घेतली. यावेळी प्रत्येक मतदानाचे योग्य वय असलेल्या विद्यार्थ्यांनी मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य करून लोकशाही उत्सव अधिक प्रकाशमान करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन प्रभातचे संस्थापक संचालक डॉ. गजानन नारे यांनी केले.
कार्यक्रमाची सुरूवात दीपप्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉ. गजानन नारे होते. व्यासपीठावर संचालिका वंदना नारे, सचिव नीरज आवंडेकर, शिल्पा आवंडेकर, ज्येष्ठ पत्रकार विशाल राजे, श्रुती राजे, प्राचार्या वृषाली वाघमारे, उपप्राचार्य अर्चना बेलसरे, सिनीअर को-ऑर्डीनेटर मो.आसिफ, सी.बी.एस.ई. को-ऑर्डीनेटर प्रशांत होळकर, माजी प्राचार्या कांचन पटोकार प्रामुख्याने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य वृषाली वाघमारे, संचालन प्रभात माजी विद्यार्थी संघटनेचे प्रवर्तक अॅड. वल्लभ नारे तर आभार प्रदर्शन उपप्राचार्य अर्चना बेलसरे यांनी केले. कार्यक्रमाला प्रभातचे 300 च्यावर माजी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारीवृंद उपस्थित होते. आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येकाला मतदान करण्यासाठी प्रवृत्त करू अशी शपथ सगळ्या उपस्थितांनी याप्रसंगी घेत लोकशाही बळकट करण्यासाठी समर्थकता दर्शविली.