Thursday, December 26, 2024
Homeताज्या घडामोडीShare Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty...

Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगला शेअर बाजारात जोरदार खरेदी; Sensex-Nifty मध्ये तुफान तेजी

अकोला दिव्य ऑनलाईन : Share Market Muhurat Trading : मुहूर्त ट्रेडिंगच्या निमित्ताने शेअर बाजारात आज शुक्रवारी जोरदार खरेदी दिसून आली. शुक्रवार, १ नोव्हेंबर रोजी सेन्सेक्सनं ५०० अंकांची झेप घेत पुन्हा एकदा ८० हजारांचा टप्पा ओलांडला. निफ्टीही जोरदार कामगिरी करत १५० अंकांची झेप घेत २४,३६८ अंकांवर पोहोचला. 


बीएसई निर्देशांकातील सर्व २९ शेअर्स ग्रीन झोनमध्ये व्यवहार करताना दिसले. महिंद्रा अँड महिंद्रा, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, एनटीपीसी, अॅक्सिस बँक, टायटन, इंडसइंड बँक, बजाज फिनसर्व्ह आणि कोटक बँक यांच्या शेअर्समध्ये एक टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली.

कधी झाली सुरुवात?

१९५७ साली मुंबई शेअर बाजारात (बीएसई) मुहूर्त ट्रेडिंगला सुरुवात झाली. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर (एनएसई) मुहूर्त ट्रेडिंग १९९२ मध्ये सुरू झालं. इलेक्ट्रॉनिक डिमॅट खाती सुरू होण्यापूर्वी ट्रेडर्स एक्स्चेंजमध्ये येऊन मुहूर्त ट्रेडिंगमध्ये सहभागी होत असत.

कशी होती कामगिरी?

गेल्या ११ वर्षांच्या मुहूर्त ट्रेडिंगचा इतिहास पाहिला तर शेअर बाजाराने ११ पैकी ९ सत्रांमध्ये सकारात्मक कामगिरी केली आहे. २०१८ पासून मुहूर्त ट्रेडिंगच्या दिवशी बाजारानं सातत्यानं सकारात्मक परतावा दिलाय. केवळ २०१६ आणि २०१७ मध्ये त्यानं नकारात्मक परतावा दिला.

२०२३ च्या मुहूर्त ट्रेडिंग सत्रात सेन्सेक्स ३५५ अंकांनी वधारून ६५,२५९ वर आणि निफ्टी ५० निर्देशांक १०० अंकांनी म्हणजे ०.५२ टक्क्यांनी वधारून १९,५२५ वर होता. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्सनं या कालावधीत लार्जकॅपला मागे टाकलं, बीएसई मिडकॅप निर्देशांकानं ०.६७ टक्के आणि बीएसई स्मॉलकॅप निर्देशांकाने १.१४ टक्के परतावा दिला.


https://www.akoladivya.com/business/stock-market/share-market-muhurat-trading-heavy-buying-in-share-market-at-muhurat-trading-sensex-nifty-surges-

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!