अकोला दिव्य ऑनलाईन : अकोला जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदारसंघात काल शेवटच्या दिवशी 100 जणांनी 128 अर्ज सादर केले. तर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवसापासून कालच्या शेवटच्या दिवसापर्यंत 129 उमेदवारांनी 180 अर्ज दाखल केले.
निवडणूक यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, अकोट विधानसभा मतदारसंघात काल शेवटच्या दिवशी 20 उमेदवारांनी 25 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 22 उमेदवारांनी 30 अर्ज दाखल केले.
बाळापूर मतदार संघात काल शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांनी 24 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 29 उमेदवारांनी 38 अर्ज दाखल केले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघात काल शेवटच्या दिवशी 19 उमेदवारांनी 27 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 23 उमेदवारांनी 37 अर्ज दाखल केले.
अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात काल शेवटच्या दिवशी 16 उमेदवारांनी 21 अर्ज दाखल केले.आतापर्यंत 23 जणांनी 37 अर्ज दाखल केले.
मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात 26 उमेदवारांनी 31 अर्ज दाखल केले. आतापर्यंत 32 व्यक्तींनी 38 अर्ज दाखल केले.
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघ
अकोला पश्चिम मतदारसंघात दाखल करण्यात आलेल्या अर्जात विजय अग्रवाल (भाजप- दोन अर्ज), सुमंत तिरपुडे (पी. पार्टी ऑफ इंडिया डे.), सुनील शिरसाठ (अपक्ष), मो. सोहेल मो. हुसेन (सोशल डेमॉ. पार्टी), प्रशंसा अंबेरे (मनसे), राजेश मिश्रा (शिवसेना (ठाकरे) आणि एक अपक्ष), संजय बडोणे (अपक्ष), हरिश अलिमचंदानी (अपक्ष), दिनेश श्रीवास (लोकतांत्रिक जनाधार पक्ष आणि एक अपक्ष), भगवान दंदी (अपक्ष), मदन भरगड (अपक्ष), साजिद खान म. खान (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस 3 अर्ज), अशोक ओळंबे (प्रहार जनशक्ती पक्ष आणि अपक्ष असे दोन अर्ज), राजेश वर्मा (अपक्ष), बन्सीलाल प्रजापती (अपक्ष), जिशान हुसैन (वंचित बहुजन आघाडी), प्रकाश डवले (अपक्ष-२ अर्ज) भरतकुमार मिश्रा (अपक्ष), नंदकिशोर ढोरे (अपक्ष), मिर्झा इम्रान बेग (रासप) यांचा समावेश आहे.