Wednesday, November 20, 2024
Homeराजकारणअकोला पश्चिममध्ये 'महासंग्राम' ! भाजपात बंडखोरी ? ठाकरे गटाचे आव्हान

अकोला पश्चिममध्ये ‘महासंग्राम’ ! भाजपात बंडखोरी ? ठाकरे गटाचे आव्हान

अकोला दिव्य ऑनलाईन : सुसंस्कृत आणि शिस्तबद्ध पक्ष, अशी ओळख असलेल्या भारतीय जनता पक्षाला यंदा बंडखोरीची लागण झाली आहे. ‘पार्टी विथ डिफरन्स’ असं बिरुद घेऊन वाटचाल करणाऱ्या भाजपाने आरोप मोठ्या प्रमाणावर विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करुन रानं पेटवून देत, सत्ता काबीज केली.पण त्यानंतर भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या विरोधी पक्षांचे मोठ्या प्रमाणावर भाजपात ‘इनकमिंग’ सुरू होऊन आज पक्षात असंतोष खदखदत आहे.

आज अकोला विधानसभा मतदारसंघात भाजपा निष्ठावंत कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी बंडाचा झेंडा हाती घेतला आहे.

अकोला शहरात भाजपाचे संघटन मजबूत करण्यासाठी परिश्रम घेतलेल्यांपैकी जुने शहरातील डॉ.अशोक ओळंबे पाटील एक असून आमदार स्व. लालजी यांच्या खांद्याला खांदा लावून झटणारे ओळंबे पाटील यांनी प्रहार संघटनेकडून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेत, आज त्यांनी उमेदवारी अर्ज देखील दाखल केला आहे. मागील निवडणुकीत त्यांना तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीस यांनी शब्द दिला होता.

तेव्हा पाटील यांनी माघार घेतली आणि मागील पाच वर्षांपासून ते मतदारसंघात मोर्चेबांधणी केली. मात्र त्यांना उमेदवारी नाकारली गेल्यावर ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत.

यासोबतच माजी नगराध्यक्ष व भाजपाचे जेष्ठ नगर सेवक हरीशभाई अलिमचंदानी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून आपली उमेदवारी जाहीर केले आहे. पक्षश्रेष्ठीनी काहीही केले तरी परत मागे फिरणारं नाही, अशी ओळंबे पाटील यांनी भुमिका घेतली आहे.

तर हरीश अलिमचंदानी देखील याच मुड मध्ये असल्याने अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघांतील बंडोबांनाचा थंडोबा होतो की अधिकृत उमेदवार अग्रवाल यांना स्वपक्षातील लोकांसोबत लढाई करावी लागणार काय? हे ४ नोव्हेंबरला सायंकाळी स्पष्ट होईल. एकमात्र खरं की, यंदा या मतदारसंघात महासंग्राम होईल, असं चित्र निर्माण होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!