अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रिसोड, कारंजा मतदारसंघासाठी भाजपाकडून अनुक्रमे नकुल देशमुख आणि ज्ञायक पाटणी यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता नाही,असं वृत्त सर्व प्रथम २० ऑक्टोबर २०२४ रोजी ‘अकोला दिव्य’ मध्ये प्रकाशित करण्यात आले होते आणि आज ते १०० टक्के खरं ठरले आहे. यासोबतच मुर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात विद्यमान आमदार हरीश पिंपळे ‘रन आऊट’ होणार, पण थर्ड अम्पायरच्या निर्णयाकडे अपील पेंडिंग आहे. असं भाकित केले होते. सध्यातरी पिंपळे ‘रन आऊट’ असून आज सायंकाळी बळीराम सिरस्कार शिंदे यांच्या शिवसेनेची उमेदवारी निश्चित असल्याचे वृत्त प्रकाशित केले आणि हे वृत्त देखील खरं ठरले आहे.
अकोला पुर्व विधानसभा मतदारसंघात विजय अग्रवाल यांनाच उमेदवारी मिळणार आहे, हा दावा केला होता. राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होऊ शकतं, पण अकोला पुर्व, रिसोड, कारंजा, मुर्तिजापूर आणि बाळापूर या विधानसभा मतदारसंघातील राजकीय आणि पक्षांतर्गत घडामोडींचं सुक्ष्म अवलौकन केले असता, अनेक बाबींचा उलगडा होतो. आता लक्ष ‘जय-पराजय’ कोणाचा होतो, हे बघणं मजेशीर होईल.