अकोला दिव्य ऑनलाईन Thackeray Group Candidate List : विधानसभेची निवडणूक (Vidhan Sabha Election 2024) जाहीर झाल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडीतील पक्षांकडून उमेदवारांच्या याद्या जाहीर करण्यात येत आहेत. आज शनिवार २६ ऑक्टोबर रोजी शिवसेना (ठाकरे) पक्षाची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. याआधी शिवसेना ठाकरे गटाकडून ६५ उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली होती. यानंतर आज १५ उमेदवारांची घोषणा ‘सामना’मधून करण्यात आली आहे. यामध्ये धुळे शहर, चोपडा, जळगाव शहर, बुलढाणा, दिग्रस, हिंगोली, देवळाली, श्रीगोंदा, कणकवली, भायखळा, शिवडी, वडाळा, कल्याण पूर्व, कल्याण पश्चिम, देवळाली, परतूर या मतदारसंघाचा सहभाग आहे.
कोणाला कोणत्या मतदारसंघातून मिळाली संधी?
शिवडीमधून अजय चौधरी, धुळे शहर-अनिल गोटे, चोपडा-राजू तडवी, जळगाव शहर-जयश्री सुनील महाजन, बुलढाणा-जयश्री शेळके, दिग्रस- पवन श्यामलाल जयस्वाल, हिंगोली-रूपाली राजेश पाटील, परतूर-आसाराम बोराडे, देवळाली-योगेश घोलप, कल्याण पश्चिम-सचिन बासरे, कल्याण पूर्व-धनंजय बोडारे, वडाळा-श्रद्धा श्रीधर जाधव, भायखळा-मनोज जामसुतकर, श्रीगोंदा-अनुराधा राजेंद्र नागावडे, कणकवली- संदेश भास्कर पारकर यांचा समावेश आहे.
दरम्यान, शिवसेनेचा (उद्धव ठाकरे) बालेकिल्ला असलेला शिवडी विधानसभा मतदारसंघ गेल्या काही दिवसांपासून पक्षांतर्गत चुरशी वाढल्यामुळे घडामोडींना वेग आला होता. अजय चौधरी आणि सुधार साळवी हे दोघेही या मतदारसंघासाठी इच्छुक होते. पक्षश्रेष्ठींनी हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न केल्यानंतरही दोन्ही इच्छुकांनीही माघार घेतली नव्हती. ‘मातोश्री’ यातून कसा मार्ग काढणार? याकडे शिवडीतील कार्यकर्त्यांचे लक्ष लागले होते. मात्र, अखेर आज शिवडी विधानसभा मतदारसंघासाठी अजय चौधरी यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.
मतदारसंघाचे नाव | उमेदवार | |
१ | शिवडी | अजय चौधरी |
२ | धुळे शहर | अनिल गोटे |
३ | चोपडा | राजू तडवी |
४ | जळगाव शहर | जयश्री सुनील महाजन |
५ | बुलढाणा | जयश्री शेळके |
६ | दिग्रस | पवन श्यामलाल जयस्वाल |
७ | हिंगोली | रुपाली राजेश पाटील |
८ | परतूर | आसाराम बोराडे |
९ | देवळाली | योगेश घोलप |
१० | कल्याण पश्चिम | सचिन बासरे |
११ | कल्याण पूर्व | धनंजय बोडारे |
१२ | वडाळा | श्रद्धा श्रीधर जाधव |
१३ | भायखळा | मनोज जामसुतकर |
१४ | श्रीगोंदा | अनुराधा राजेंद्र नागावडे |
१५ | कणकवली |