Tuesday, January 28, 2025
Homeताज्या घडामोडीअखेर अकोला पश्चिम मधुन भाजपचे विजय अग्रवाल रिंगणात ! भाजपा उमेदवारांची दुसरी...

अखेर अकोला पश्चिम मधुन भाजपचे विजय अग्रवाल रिंगणात ! भाजपा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर

Maharashtra BJP 2nd Candidate List For Assembly Election 2024 :अकोला दिव्य ऑनलाईन : पश्चिम विदर्भातील सर्वांचे लक्ष लागून असलेल्या अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघातून अखेर माजी महापौर विजय अग्रवाल यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली असून, आता कॉंग्रेस पक्षाकडून निवडणूक रिंगणात कोण ? गत निवडणुकीत अवघ्या दोन हजार मतांनी पराभूत झालेले साजीद खान पठाण की, रमाकांत खेतान अथवा माजी राज्यमंत्री अझहर हुसेन यांचे पुत्र डॉ. झिशान हुसेन याबाबत सर्वांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत एकूण २२ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यापूर्वी पक्षाने जाहीर केलेल्या पहिल्या यादीत ९९ उमेदवारांचा समावेश होता. दोन्ही याद्या मिळून भाजपाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आतापर्यंत १२१ उमेदवार जाहीर केले आहेत. आज भाजपाने जाहीर केलेल्या यादीत राम भदाणे यांना धुळे ग्रामीण मधून तर श्याम खोडे यांना वाशिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्यजीत देशमुखांना शिराळा मतदारसंघातून विधानसभेच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याचबरोबर गोपीचंद पडळकरांना जत मतदारसंघातून उणेदवारी देण्यात आली आहे. यासह नाशिक मध्य या विधानसभा मतदारसंघावरून मोठी रस्सीखेच चालू होती, त्यावर भाजपाने तोडगा काढला आहे. पक्षाने देवयानी फरांदे यांना नाशिक मध्य या मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट दिलं आहे.

Follow our page for latest updates & offers
Sati Mobile, Akola.

याआधी भाजपाने ९९ उमेदवार जाहीर केले होते. यामध्ये भाजपाने देवेंद्र फडणवीस यांना नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. तर प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना कामठी मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच

यांना वांद्रे पश्चिम, अतुल भातखळकर यांना कांदिवली पूर्व, राम कदम यांना घाटकोपर पश्चिम, मीहिर कोटेचा यांना मुलूंड, गणेश नाईक यांना ऐरोली, रविंद्र चव्हाण यांना डोंबिवली, चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड, तर विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना कुलाबा मतदारसंघातून संधी देण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!