अकोला दिव्य ऑनलाईन : बालकलावंतांच्या उत्कर्षासाठी सातत्याने कार्यरत व बालकांच्या सांस्कृतिक शैक्षणिक गरजा आणि हक्क मिळवून देण्यासाठी सक्रिय बाल रंगभूमी परिषदेच्या शाखा अकोलातर्फे दिव्यांग बालकलावंतांना रंगमंच उपलब्ध व्हावा या हेतूने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात ‘यहाँ के हम सिकंदर’ या सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बालरंगभूमी परिषद मुंबई मध्यवर्ती शाखा अध्यक्ष ॲड. नीलम शिर्के (सामंत) लाभल्या होत्या. प्रमुख अतिथी म्हणून प्रभात किड्स स्कूलचे संचालक डॉ. गजानन नारे, श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर भिसे, समाजसेविका मंजुश्री कुलकर्णी, बालरंगभूमी परिषद शाखा जळगावचे योगेश शुक्ल, बाल रंगभूमी परिषद शाखा नंदुरबारचे नागसेन पेंढारकर, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई नियामक मंडळ सदस्य गीताबाली उनवणे यांची उपस्थिती लाभली. बालरंग भूमी परिषद शाखा अकोला अध्यक्ष अशोक ढेरे, कार्याध्यक्ष विनोद साकरकर, प्रमुख कार्यवाह सुधाकर गीते, कोषाध्यक्ष प्रमोद गोलडे, सदस्य डॉ. शिरीन देशमुख तसेच ज्येष्ठ रंगकर्मी व नाट्यदिग्दर्शक अरुण घाटोळे यांच्या हस्ते मान्यवरांचा सहृदय सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमात अकोल्यातील उत्कर्ष शिशुगृह, गायत्री बालिकाश्रम, बालविकास विशेष शाळा कर्णबधिर, शासकीय मूकबधिर विद्यालय, सूर्योदय बालगृह, कनुभाई ओरा अंध विद्यालय येथून जवळपास 100 दिव्यांग बालकलावंतांनी आपली कला प्रस्तुत केली. ज्यामध्ये नृत्य, गायन, वादन, नाटिका यांचा समावेश होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालरंगभूमी परिषद शाखा अकोल्याचे अध्यक्ष अशोक ढेरे तर बहारदार सूत्रसंचालन प्रभात किड्स सांस्कृतिक विभाग प्रमुख व बालरंग भूमी परिषद शाखा अकोल्याचे उपाध्यक्ष (उपक्रम) नंदकिशोर डंबाळे यांनी व आभार प्रमुख कार्यवाह सुधाकर गीते यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नंदकिशोर डंबाळे, विनय बोदडे, दिनेश आगाशे यांनी परिश्रम घेतले.