अकाेला दिव्य ऑनलाईन : शहरातील ॲड. धनश्री देव स्मृती प्रकल्प, निलेश देव मित्र मंडळाच्यावतीने संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पीटलच्या सहकार्याने रविवार २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते ४ वाजेपर्यंत अंतरंग पब्लिक स्कूल, न्यू तापडिया नगर येथे मोफत हृदयरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
अमरावती येथील संत अच्युत महाराज यांनी स्थापन केलेल्या हार्ट हॉस्पिटलला २५ वर्ष पूर्ण होत असल्या निमित्ताने मोफत हृदयरोग निदान शिबिर आयोजित करण्यात येत आहे. संत अच्युत महाराज हार्ट हॉस्पिटल येथे हृदयविकाराच्या रुग्णांवर मोफत इलाज केला जातो. शहरात अनेक गरीब, गरजु रूग्ण हृदयविकाराने पीडित आहेत. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे योग्यवेळी निदान व उपचार मिळत नाहीत. त्यामुळे मोफत हृदयरोग शिबिराचा गरीब व गरजू रूग्णांना व्हावा. हा शिबिरामागील उद्देश आहे. याचा लाभ घ्यावा. असे आवाहन नीलेश देव मित्र मंडळाचे शैलेश देव यांनी केले आहे.