Friday, October 18, 2024
Homeताज्या घडामोडीमहाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 रोजी मतमोजणी ! महाराष्ट्रात ९ कोटी...

महाराष्ट्रात 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 रोजी मतमोजणी ! महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार ; आचार संहिता लागू

अकोला दिव्य ऑनलाईन : महाराष्ट्र आणि झारखंड राज्यांच्या विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून महाराष्ट्रात एकाच टप्प्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. या मतदानाची मोजणी 23 नोव्हेंबरला सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासोबतच आजच महाराष्ट्र आणि झारखंड या दोन्ही राज्यांमध्ये आचारसंहिता लागू झाली आहे.अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी आज मंगळवार १५ ऑक्टोबर रोजी केली आहे.

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२४ आणि झारखंड विधानसभेचा कार्यकाळ ५ जानेवारी २०२५ ला संपणार आहे. या अनुषंगाने आज पत्रकार परिषदेत राजीव कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्यात उमेदवारी अर्ज दाखल करण्याला २२ ऑक्टोबरपासून सुरूवात होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २९ ऑक्टोबर आहे. उमेदवारी अर्जाची छानणी ३० ऑक्टोबरला करण्यात येणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची तारीख ४ नोव्हेंबर २०२४ आहे. मतदान २० नोव्हेंबरला होणार आणि २३ नोव्हेंबरला मतमोजणी सुरू करण्यात येणार आहे. या दोन राज्यांच्या निवडणुकीसोबतच तीन लोकसभा आणि १३ राज्यांच्या ४९ विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणूक घेतली जाणार आहे.महाराष्ट्रात ९ कोटी ३ लाख मतदार आहेत. यापैकी ४ कोटी ९३ लाख पुरुष तसेच ४ कोटी ६० लाख महिला मतदार आहेत. एकूण मतदारसंघ २८८ आहेत. त्यापैकी २५ अनुसूचित जाती तर २९ अनुसूचित जमीतीसाठी राखीव आहेत.महाराष्ट्रात १ लाख १५८ मतदार निवडणूक केंद्र आहेत. यापैकी शहरी भागात ४२ हजार ६०४ तर ग्रामीण भागात ५७ हजार ५८२ केंद्र आहेत. अशी माहिती राजीव कुमार यांनी दिली.

निवडणुकीचे हे वातावरण केवळ दोन राज्यांपुरतेच मर्यादित राहणार नसून उर्वरित १३ राज्यांतही पोटनिवडणुकीची लागण्याची शक्यता आहे. तसेच ३ लोकसभा मतदारसंघांतही पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. यामुळे देशभरात पुन्हा एकदा निवडणुकीचे वातावरण निर्माण होणार आहे. हरियाणाचा निकाल धक्कादायक लागल्याने महाराष्ट्रातही तसेच होईल या का, याकडे देशभराचे लक्ष लागलेले आहे.

राहुल गांधी यांनी राजीनामा दिल्याने वायनाडची लोकसभा जागा रिक्त झाली आहे. तसेच महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघातील खासदार वसंत चव्हाण यांचे निधन झाल्याने ती देखील जागा रिक्त आहे. याचबरोबर पश्चिम बंगालच्या बशीरहाटच्या तृणमूल खासदारांचेही निधन झाले आहे. यामुळे या तिन्ही जागांवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. 

कोणकोणती राज्ये आणि किती जागा

याचबरोबर १३ राज्यांच्या ४९ विधानसभा मतदारसंघांमध्ये देखील पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेशच्या १०, राजस्थान ७, पश्चिम बंगाल ६, आसाम ५, बिहार ४, पंजाब ४, कर्नाटक ३, केरळ ३, मध्य प्रदेश २, सिक्किम २, गुजरात १, उत्तराखंड १ आणि छत्तीसगडच्या १ जागांवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. 

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!