अकोला दिव्य ऑनलाईन : नॅशनल एज्युकेशन पॉलिसी- 2020 आणि सी.बी.सी.एस. पॅटर्नवर एल.आर.टी कॉमर्स कॉलेजमध्ये दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न झाली. बी.कॉम आणि एम. कॉम. सेमिस्टर -1 च्या विद्यार्थ्यांसाठी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी -2020 वर आणि बी.कॉम. सेमिस्टर -3 व बी.कॉम. सेमिस्टर-5 च्या विद्यार्थ्यांसाठी चॉईस बेस क्रेडिट सिस्टीम वर कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी प्राचार्य डॉ. जी.जी.गोंडाणे यांनी केले.
अभ्यासक्रमातील बदल स्वीकारणे व आन्सिलरी क्रेडिट गोळा करणे हे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे, असे त्यांनी प्रतिपादन केले. तज्ञ मार्गदर्शक डॉ. महेश डाबरे यांनी विद्यार्थ्यांना उत्तम मार्गदर्शन केले. मेजर विषय आणि मायनर विषय कसे निवडायचे याबद्दल त्यांनी सविस्तर माहिती दिली. ॲबिलिटी इन्हान्समेंट कोर्स, जनरिक ओपन इलेक्टिव्ह कोर्स, व्हॅल्यू एज्युकेशन कोर्स, इंडियन नॉलेज सिस्टीम या विषयावरही त्यांनी प्रकाशझोत टाकला. अभ्यासक्रमासोबतच विद्यार्थ्यांनी अंसिलरी क्रेडीट कसे मिळवावे, ऑन जॉब ट्रेनिंग, वर्क एक्सपिरीयन्स, फिल्ड वर्क, अप्रेंटीसशीप याबद्दलही विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. अंसिलरी क्रेडिट मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी कोण – कोणत्या ऍक्टिव्हिटीज मध्ये सहभाग घ्यावा याबद्दलही सविस्तर सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांना अंसिलरी क्रेडिट कसे महत्त्वाचे आहेत हे सांगितले. अन्यथा विद्यार्थ्यांचा निकाल अनुत्तीर्ण असा येईल हेही त्यांनी सांगितले. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी -2020 विद्यार्थ्यांसाठी कशी महत्त्वपूर्ण आहे.यावर त्यांनी प्रकाश टाकला. विद्यार्थी इंटर डिसिप्लिनरी व मल्टी डिसिप्लिनरी विषय कसे निवडू शकतात याचीही माहिती देण्यात आली. ॲकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, एस.जी.पी.ए., सी.जी.पी.ए. याबद्दलही सांगण्यात आले. आभार प्रदर्शन डॉ. एच.बी. बडवाईक तर संचलन डॉ. निलेश चोटीया यांनी केले. यावेळी वरिष्ठ महाविद्यालयातील समस्त प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.