अकोला दिव्य ऑनलाईन : माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोमवारी नियमित तपासणीसाठी मुंबईतील एच.एन रिलायन्स रुग्णालयात चेकअपसाठी गेले आहेत. सकाळपासून उद्धव ठाकरे रुग्णालयात आहेत. काही वर्षांपूर्वी ठाकरेंची अँजिओप्लास्टी झाली होती. अलीकडे त्यांना पुन्हा त्रास झाल्याची माहिती आहे.
उद्धव ठाकरे हे आरोग्य तपासणीसाठी एच.एन रिलायन्स रुग्णालयात गेले, ठाकरेंच्या हृदयाच्या धमन्यांमधील ब्लॉकेज तपासण्यासाठी चाचण्या केल्या. या रिपोर्टमध्ये ब्लॉकेज आढळल्याने उद्धव ठाकरेंवर पुन्हा एकदा अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. सकाळी ८ वाजता उद्धव ठाकरे रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. याआधी २०१२ साली ठाकरेंवर लिलावती रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती.