Friday, October 18, 2024
Homeगुन्हेगारीअकोटचा प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ! सिद्दीकी यांच्या हत्येचा कटात...

अकोटचा प्रवीण लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी ! सिद्दीकी यांच्या हत्येचा कटात सहभाग ?

Akoladivya: Baba Siddique : बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात आरोपी प्रवीण लोणकरला आज सोमवार १४ ऑक्टोबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने लोणकरला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबुक पेजवरून शेयर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते. या प्रकरणात त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक करण्यात आली.

रविवारी नेमकं काय घडलं?

पोलिसांनी त्याच्या अकोट येथील घरी दाखल झाले. मात्र, घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील घरी छापा टाकला. त्यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. तसेच पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कटात सहभागी होते, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आता शुभम लोणकर याचा शोध घेत आहेत.शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर याला आज न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयाने त्याला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

error: Content is protected !!